Friday, May 9, 2025
HomeदेशPahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताची घुसखोरी विरोधात कठोर मोहीम!

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताची घुसखोरी विरोधात कठोर मोहीम!

चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त

बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. काल रात्रीच्या सुमारास बारामुल्लामध्ये झालेल्या भारताची घुसखोरीविरोधी मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून १० किलो आयईडी (IED) आणि शस्त्रसाठा जप्त झाला आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर २४ तासाच्या तपासाची माहिती! दहशतवाद्यांबद्दल ४ गोष्टी जाणून घ्या

१६१ इन्फंट्री ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर मयंक शुक्ला (Brigadier Mayank Shukla) यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून भारतीय सुरक्षा दलांना (Indian Security Forces) गुप्तचर संस्थांकडून उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हालचालींबद्दल सतत माहिती मिळत होती. . २२ आणि २३ एप्रिलच्या मध्यरात्री, पहाटे १ वाजता, भारतीय सैन्याला उरी नाल्याजवळील एका लॉन्चपॅडवर दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली. त्यानंतर काल रात्री घुसखोरीविरोधी मोहीम राबवण्यात आली. यावेळी एलओसीजवळील दहशतवाद्यांच्या हालचालींचा मार्ग काढण्यात आला आणि त्यांनी पहाटे ३ वाजता एलओसी ओलांडली. दोन तास सतत गोळीबार झाल्यानंतर, सुरक्षा दलांनी हल्ला करून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

त्याचबरोबर “आमच्या सुरक्षा दलांनी या घनदाट जंगलात निर्जंतुकीकरण आणि शोध मोहीम राबवली. जम्मू आणि काश्मीर पोलीस त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत – २ एके रायफल, एक ९ मिमी चायनीज पिस्तूल, मॅगझिन आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा. याव्यतिरिक्त, एक १० किलो आयईडी देखील जप्त करण्यात आला आहे…”, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -