मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित समस्या वाढतात. अशातच डिंकाचे सेवन करणे अतिशय फायदेशीर ठरते. तसेच उन्हाळ्यात होणाऱ्या लूच्या समस्येपासूनही बचाव करता येतो. याचे सेवन कोणीही करू शकते.
रोगप्रतिकारक क्षमता वाढते
डिंकामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यातील अँटी ऑक्सिडंट शरीराला मोसमी आजारांपासून वाचवतात. याच्या सेवनामुळे शरीरास एनर्जी मिळते.
त्वचेसाठी फायदेशीर
अँटी एजिंग आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुणांनी भरपूर असलेला डिंक त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यामुळे त्वचा फ्री रॅडिकल्सपासून बचावते. तसेच पिंगमेंटेशन, सुरकुत्या आणि पिंपल्स कमी करण्यास मदत होते.
वजन कमी करण्यास फायदेशीर
वजन घटवण्यासाठीही डिंक फायदेशीर आहे. यांच्या सेवनाने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वारंवार भूक लागत नाही. तसेच भरपूर खाल्ले जात नाही. वजन कमी करण्यास मदत मिळते.