Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीTiger Shroff: टायगर श्रॉफला जीवे मारण्याची धमकी! खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पंजाबमधून...

Tiger Shroff: टायगर श्रॉफला जीवे मारण्याची धमकी! खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पंजाबमधून अटक

मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील एका व्यक्तीला अटक केली आहे.

बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफला जीवे (Tiger Shroff Death Threat) मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना दिली होती. मात्र, ही माहिती खोटी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे.

खोटी बातमी देणाऱ्या व्यक्तीची ओळख

मुंबईतील खार पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खोटी बातमी देणाऱ्या व्यक्तीचे नाव मनीष कुमार सुजिंदर सिंग असे आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीने खोटा दावा केला होता की टायगर श्रॉफला मारण्यासाठी काही लोकांना २ लाख रुपये आणि शस्त्रे देण्यात आली होती.

पोलिसांना देण्यात आली चुकीची माहिती

पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, आरोपींनी पोलिसांना फोन करून माहिती दिली की सुरक्षा एजन्सीशी संबंधित काही लोक टायगर श्रॉफला मारण्याचा कट रचत आहेत. पोलिसांनी तपास केला तेव्हा असे आढळून आले की ही फक्त एक अफवा होती आणि सिंग यांनी पोलिसांना चुकीची माहिती दिली होती.

खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी सिंहविरुद्ध खारमध्ये गुन्हा दाखल करून, पंजाब पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पंजाब पोलिसांनी त्या माणसाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला मुंबईत आणले जात आहे.

टायगर श्रॉफ ‘बागी ४’ च्या चित्रीकरणात व्यस्त

सध्या टायगर श्रॉफ ‘बागी ४’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए हर्ष करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -