Thursday, May 8, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखटेस्ला: रोजगार निर्मितीला चालना

टेस्ला: रोजगार निर्मितीला चालना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेस्लाचे मालक इलान मस्क यांच्यात काल दूरध्वनीवरून चर्चा झाली. या चर्चेचा सारांश भारतात टेस्लाचा प्रवेश निश्चित करण्याचा होता आणि त्या दृष्टीने दोन्ही प्रमुखांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला टॅरिफच्या धमकीने दहशतीत ठेवले असताना भारतीय पंतप्रधान अमेरिकन उद्योगपती मस्क यांच्याशी त्यांचा टेस्ला हा उद्योग भारतात विस्तारित करण्यासंदर्भात चर्चा करतो ही निश्चितच आशादायक बाब आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील उद्योगांमध्ये व्यापक चर्चा होऊ शकते आणि या दोन्ही बाबतीत प्रचंड वाव आहे, हे मोदी आणि मस्क यांच्यातील चर्चेतून स्पष्ट झाले आहे. जरी भारताचे अमेरिकेशी टॅरिफच्या मुद्यावरून संबंध बिघडलेले असले तरीही मोदी यांच्या म्हणण्यानुसार भारत अमेरिकेशी असलेली आपली भागीदारी पुढे नेऊ इच्छितो आणि मोदी यांनी हे स्पष्ट सांगितले आहे. मोदी आणि मस्क यांच्यातील चर्चेला या अर्थाने महत्त्व आहे कारण मस्क हेच सध्याच्या ट्रम्प प्रशासनात प्रभावशाली व्यक्ती म्हणून समजले जातात. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करणे हे भारतासाठी प्रचंड लाभदायक ठरू शकते. टेस्लाचे भारतातील आगमन यामुळे निश्चित झाले आहे असे समजले जाते. भारतातील अन्य विरोधी पक्षांनी टेस्लाच्या आगमनासाठी काही वर्षांपूर्वी पायघड्या घातल्या होत्या.

पण मस्क यांनी मोदी यांना पसंती दिली यावरून मोदी यांचे अमेरिकेशी आणि ट्रम्प यांच्याशी किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत ते लक्षात येते. मोदी आणि मस्क यांच्यातील चर्चेत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली असे सांगण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या स्वायत्ता धोरणाला प्रचंड महत्त्व आहे आणि भारताने कोणत्याही बाबतीत अमेरिकेच्या किंवा कोणत्याही देशाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेतला नाही हे वास्तव आहे. भारताचे कोणत्याही देशाच्या दबावाखाली न येण्याचे धोरण लक्षात घेऊन मोदी वारंवार अनेक देशांचे दौरे करत असतात, पण काल मात्र त्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. इलान मस्क यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जाते. मोदी आणि मस्क यांच्यात तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधन यावर चर्चा झाली. ही चर्चा फलद्रूप झाली तर त्याचे परिणाम दोन्ही देशांसाठी आत्यंतिक होणार आहेत. भारताची अर्थव्यवस्था सध्या चांगल्या अवस्थेत असली तरीही तिच्यावर टॅरिफचे सावट आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी मस्क यांचा आधार भारताने शोधला तर त्यात वावगे काही नाही. टेस्लाच्या आगमनाने भारतीय बाजारपेठ उत्साहाने उचबंळून येणार आहे आणि भारतीय बाजारात नव्या गाड्यांचे आगमन होणार आहे आणि त्यामुळे सध्या जी बाजाराला विशेषतः विद्युत वाहनांच्या बाजारपेठेला मरगळ आली आहे ती जाणार आहे. त्यादृष्टीने मोदी आणि मस्क यांच्यातील चर्चेचे महत्त्व अपरंपार आहे. टेस्ला कार्स ज्या विद्युतवर चालतात त्यांच्या आगमनाची भारतात प्रचंड प्रतीक्षा आहे. त्यामुळे ही चर्चा जर खरोखरच यशस्वी झाली, तर भारतीय कार उद्योगासाठी ती क्रांती ठरेल. शिवाय मरगळलेल्या कार उद्योगासाठी टेस्लाचे आगमन ही सुखद वार्ता ठरेल, त्यादृष्टीने या चर्चेकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले पाहिजे. पण त्यापेक्षा या चर्चेकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे ते सध्याच्या अमेरिकेच्या टॅरिफच्या धोरणाच्या संदर्भात.

मोदी आणि मस्क यांच्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील संभाव्य सहकार्याबाबत चर्चा झाली ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या चर्चेनंतर टेस्लाचे भारतातील आगमन निश्चित मानले जात आहे. त्यामुळे भारतातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार आहे आणि अमेरिकेच्या जगभरात जो संताप व्यक्त होत आहे त्याला कुठेतरी आळा बसेल अशी दोन्ही देशांना आशा आहे. तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात चर्चा झाली आणि त्यावर व्यापक सहमती होण्याची शक्यता आहे. मोदी यांच्यासारखा द्रष्टा पंतप्रधान लाभल्यामुळे देशाला कितीही मोठ्या संकटातून वाट काढून घेऊन जातो याचे हे उदाहरण आहे. या चर्चेचे फलित म्हणून या महिन्यात टेस्लाचे अधिकारी भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यात टेस्लाच्या आगामी आगमनासंबंधी तपशील निश्चित होईल. ही चर्चा त्यासाठीच होती असे सांगण्यात आले आहे. टेस्लाने भारतात तर भरती प्रक्रिया सुरू केली आहे अशीही चर्चा आहे. त्यामुळे विरोधक कितीही बोंबा मारोत किंवा भारताच्या सार्वभौमत्वासंदर्भात कितीही ओरड करोत, टेस्ला भारतात येणार आणि भारताला चांगले दिवस येणार हे निश्चित आहे, आता टेस्लाचे आगमन, तर निश्चित आहे. त्यामुळे भारतात आनंदाची लहर पसरणार आहे. कारण भारतातील विद्युत वाहनांची बाजारपेठ यामुळे प्रचंड उत्साहित झाली आहे. तसेच विद्युत वाहनांची खरेदी वाढणार आहे आणि त्यामुळे प्रदूषणाला आळा बसणार आहे.

मोदी आणि मस्क यांच्यातील या चर्चेकडे या सर्व प्रकारच्या सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. मोदी आणि मस्क यांच्यात चर्चा झाली ती तंत्रज्ञान आणि सहकार्यावर झाली. या दोन्ही क्षेत्रात प्रचंड सहकार्याची बीजे आहेत हे दोघांनीही ओळखले. टॅरिफच्या सावटात भारत आणि अमेरिका यांनी एक होणे गरजेचे आहे हे भारताने ओळखले आहे तितकेच ते अमेरिकेने ओळखले आहे. कारण जितकी भारताला अमेरिकेची गरज आहे तितकीच अमेरिकेलाही भारताची गरज आहे आणि मस्क यांच्याबाबतीत तर असे सांगता येईल की, त्यांच्या कंपनीसाठी भारतासारखी विशाल बाजारपेठ दुसरी नाही. चीनची आता पूर्वीसारखी स्थिती नाही आणि त्यामुळे चीनच्या कार्स मग त्या कोणत्याही असोत विद्युत वाहने असोत की साध्या कार्स, आज त्यांना अमेरिकेची बाजारपेठ नाही. त्यामुळे टेस्ला यांना भारताची गरज आहे आणि भारतालाही टेस्लाही गरज आहे. त्यामुळे या चर्चेकडे दोघानींही सकारात्मक दृष्टीने पाहिले आणि त्याचे परिणाम दोन्ही देशांसाठी चांगलेच होणार आहेत. या चर्चेचे स्वागत करायला हवे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -