मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा या चार क्रिकेटपटूंना ए+ श्रेणीत करारबद्ध करण्यात आले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल सात कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
BCCI announces annual player retainership 2024-25 – Team India (Senior Men)#TeamIndia
Details 🔽https://t.co/lMjl2Ici3P pic.twitter.com/CsJHaLSeho
— BCCI (@BCCI) April 21, 2025
मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, रिषभ पंत या सहा क्रिकेटपटूंना बीसीसीआयने ए श्रेणीत करारबद्ध केले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल पाच कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल.
MI vs CSK Live Score, IPL 2025 : रोहित-सूर्याचे वादळ, धोनीच्या चेन्नईवर मुंबईचा ९ विकेटनी विजय
सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर या पाच खेळाडूंना बीसीसीआयने बी श्रेणीत करारबद्ध केले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल तीन कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल.
बीसीसीआयने १९ खेळाडूंना सी श्रेणीत करारबद्ध केले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल एक कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल. सी श्रेणीतील खेळाडूंमध्ये रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्ण, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, ईशान किशन, अभिषेक शर्मा, आकाशदीप, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा यांचा समावेश आहे.
करारबद्ध खेळाडूंना वर्षभरात भारतासाठी किमान तीन कसोटी सामने, आठ एकदिवसीय सामने आणि १० T20 सामने खेळणे बंधनकारक आहे.