छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन दोन कामगारांना अमानवी अशी वागणूक दिली. मालकाचे कृत्य एवढे भयानक होते की ते बघून जंगली प्राणीही घाबरावेत. चोरीच्या संशयावरुन आईस्क्रीम कारखान्याच्या मालकाने दोन कामगारांना अर्धनग्न केले. कपडे काढून कामगारांची अंगझडती घेण्यात आली. काही सापडले नाही म्हणून चोरी करुन पैसे कुठे लपवलेत ? असा प्रश्न विचारण्यात आला. खरं बोलत नाहीत, असं वाटलं म्हणून मालकाने कामगारांची नखं उपटली आणि त्यांना बेदम चोपले. हे कमी म्हणून मालकाने दोन्ही कामगारांना विजेचे शॉक दिले. गंभीर जखमी झालेले कामगार बेशुद्ध पडले त्यावेळी त्यांना मालकाने सोडून दिले. दोन्ही कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात आले.
पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर
आपले सामान घेऊन कामगारांनी तातडीने राजस्थानमधील त्यांचे मूळ गाव गाठले. या ठिकाणी पोहोचल्यावर कामगारांनी स्थानिक पोलीस ठाण्यात कारखान्याच्या मालकाविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आणि तपास सुरू केला.
Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!
राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील अभिषेक भांभी आणि विनोद भांभी हे दोघे छत्तीसगडमधील सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील खाप्रबत्ती भागात छोटू गुर्जरच्या आइस्क्रीम कारखान्यात नोकरी करत होते. एका कंत्राटदाराच्या माध्यमातून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काम व्यवस्थित सुरू होते. पण कारखान्याचे मालक छोटू गुर्जर आणि त्यांचे सहकारी मुकेश शर्मा यांनी अभिषेक भांभी आणि विनोद भांभी या दोघांवर चोरीचा आरोप केला. यानंतर दोन्ही कामगारांना अमानवी वागणूक देण्यात आली. याआधी भांभी यांनी मालकाकडे वाहन कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी २० हजार रुपये मागितले होते. मालकाने पैसे देण्यास नकार दिल्यावर अभिषेक भांभी आणि विनोद भांभी यांनी नोकरी सोडत असल्याचे जाहीर केले. हे ऐकताच मालकाला राग आला. मालकाने त्याचे सहकारी मुकेश शर्मा याच्या मदतीने दोन्ही कामगारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. कामगारांनी ऐकावे म्हणून त्यांच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला. यानंतर मालकाने दोन्ही कामगारांना अमानवी अशी वागणूक दिली. या वागणुकीमुळे गंभीर जखमी झालेले कामगार बेशुद्ध पडले त्यावेळी त्यांना मालकाने सोडून दिले. दोन्ही कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात आले.
काम सुटताच अभिषेक भांभी आणि विनोद भांभी यांनी तडक राजस्थान गाठले आणि भिलवाडा जिल्ह्यातील मूळगावी पोहोचताच स्थानिक गावात पोलिसांकडे झिरो एफआयआर नोंदवली. या एफआयआरच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पण काखान्यातील घटनेचा व्हिडीओ कोणीतरी शूट केला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि पोलिसांनी मालकाविरुद्ध झिरो एफआयआर नोंदवली.