मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणजेच गौरव मोरे याच एक मोठं स्वप्न आज पूर्ण झालं.त्याने आलिशान कार घेतील आहे. किंमत बघूनच लोकांना आश्चर्य वाटेल एवढी महागडी कार त्याने घेतली आहे. गौरवने त्याचे कारसोबतचे व्हिडीओ शेअर केले आहेत.
गौरव मोरेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे. एका शो मुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्याने फक्त शो नाही तर मराठी चित्रपटात काम सुद्धा केलं आहे. त्याने त्याच्या टॅलेंटच्या जोरावर लोकांमध्ये आपली क्रेझ निर्माण केली आहे. गौरवने मराठीतच नाही तर हिंदी इंडस्ट्रीमध्येही काम केलं आहे. गौरवने शून्यातून आपलं यशाचं जग तयार केलं आहे.इथपर्यंत पोहोचायला त्याने घेतलेली मेहनत सर्वांनी पाहिली आहे.
गौरवने अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितलं आहे. त्याचं एक आलिशन कार घेण्याचं स्वप्न होत.ते त्याने आज पूर्ण केलं. त्याची झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. गौरवने स्क्वोडा कार विकत घेतली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. नवी कार घेतल्यानंतर गौरव मोरे खूपच आनंदात आहे. गौरवने Skoda Kushaq कारचा व्हिडीओ शेअर करत “फायनली नवीन गाडी घेतली…”, असं कॅप्शनही दिलं आहे.
Skoda Kushaq ही SUV 1.0 लिटर TSI पेट्रोल इंजिनसह येते. जी 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार सहा स्पीड मॅन्युअल किंवा सहा स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. यामध्ये ३८५ लिटर बूट स्पेस, ५० लिटर फ्युएल टँक आणि १७ किमी. प्रति लिटर मायलेज आहे.
Skoda Kushaq ची किंमत मॉडेलनुसार वेगवेगळी असते. पुण्यात या कारची ऑन-रोड किंमत १२.६६ लाखांपासून सुरू होते. गौरव मोरेने कोणते मॉडेल घेतले आहे हे अद्याप स्पष्ट नाही परंतु अंदाजे १२.५ लाख ते वीस लाखांदरम्यान ही कार असू शकते.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…