Thursday, May 8, 2025
Homeक्रीडाIPL 2025Dot Ball : IPL चे डॉट बॉल आणि झाडांचं काय आहे कनेक्शन...

Dot Ball : IPL चे डॉट बॉल आणि झाडांचं काय आहे कनेक्शन ?

सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून बसताहेत. दरवर्षी आयपीएलमध्ये काहीतरी विशेष पाहायला मिळतं. यंदाही तुम्ही आयपीएलच्या मॅचेसमध्ये प्रत्येक डॉट बॉलला स्क्रीनवर एक झाड दाखवलेलं पाहात असाल. डॉट बॉल आणि झाडाचा काय संबंध, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे.

Mumbai News : वाढत्या उन्हामुळे मुंबईकर घामांच्या धारांनी हैराण! त्वचाविकारांच्या रुग्णसंख्येत वाढ

डॉट बॉल म्हणजे ज्या चेंडूवर बॅटरला एकही धाव काढता येत नाही. प्रत्येक क्रिकेट सामन्यात असे अनेक डॉटबॉल्स पडतात. पण, या डॉट बॉल्ससाठी आता आयपीएलमध्ये एक झाड दाखवलं जातं. ते झाड दाखवण्याचं कारण ग्रीन डॉट बॉल्स हा उपक्रम. आधी झालेल्या महिलांच्या प्रीमिअर लीग स्पर्धेत आणि सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात जे डॉट बॉल पडतात, त्या सगळ्या बॉल्ससाठी प्रत्येकी ५०० झाडं लावण्यात येतात. बीसीसीआय आणि टाटा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने २०२३च्या आयपीएल सीझनपासून हा उपक्रम राबवला जातोय. या उपक्रमातून आतापर्यंत संपूर्ण देशात ४ लाखांपेक्षा जास्त झाडं लावण्यात आली आहेत.

क्रिकेट या खेळाचा पर्यावरण संवर्धनात सहभाग वाढावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत कुठे आणि झाडे लावली याची बीसीसीआय आणि टाटा ग्रुप यांच्याकडून तपशीलवार आकडेवारी आलेली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -