Friday, May 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMumbai : मुंबईत झाडांचे ऑपरेशन, ३३० झाडांची मुळे झाली मोकळी; १६७३ झाडांना...

Mumbai : मुंबईत झाडांचे ऑपरेशन, ३३० झाडांची मुळे झाली मोकळी; १६७३ झाडांना केले वेदनामुक्त

मुंबई, (खास प्रतिनिधी) : मुंबईतील वृक्षांच्या संवर्धनासाठी महानगरपालिकेचे ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ सुरू झाले आहे. मुंबईतील वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याअंतर्गत झाडांवर खोचलेले फलक, खिळे, केबल्स काढण्यात येत असून मागील तीन दिवसांमध्ये ३३० झाडांच्या मुळांवर असलेले सिमेंट काँक्रिटचा थर काढून टाकण्यात आला आहे, तर १६७३ खिळे आणि केबल्स तसेच ४५२ फलक काढण्यात आले आहेत. येत्या ३० एप्रिल २०२५ पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. या अभियानात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह मुंबईतील स्वयंसेवी संस्था (एनजीओ) सहभागी झाल्या आहेत.

मुंबईतील ९ जलतरण तलावांमध्ये सभासद होण्याची सुवर्णसंधी

मुंबईतील रस्त्यालगतच्या वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हे अभियान हाती घेतले आहे. मुंबईतील वृक्षांचे आरोग्य सुधारावे, त्यांची वाढ व्हावी, जोपासना व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या निर्देशानुसार आणि उप आयुक्त (उद्याने) अजीत आंबी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे.

महानगरपालिकेने सन २०२२ मध्ये सर्वप्रथम हे अभियान हाती घेतले होते. पहिल्या टप्प्यात हे अभियान अत्यंत यशस्वी झाले होते. त्यामुळे आता अभियानाचा पुढचा टप्पा हाती घेण्यात आला आहे. या अभियानात वृक्षांवरील खिळे, जाहिरातीचे बॅनर / पोस्टर्स, वायर्सचे जंजाळ, वृक्षांच्या मुळाशी झालेले काँक्रिटीकरण काढून टाकण्यात येत आहे. तसेच झाडांभोवतीचे सिमेंट काढल्यानंतर तेथे लाल मातीचा थर दिला जात आहे. त्यानंतर झाडांना पुरेसे पाणी टाकले जात आहे.

वृक्ष मित्र ग्रुप आणि डायमंड गार्डन ग्रुप, पाटकर महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग तसेच अनादी आनंद ज्येष्ठ नागरी संस्था आदींसह महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थाही (NGO) सहभागी होवून याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागातील (वॉर्ड ऑफिस ) रस्त्यालगतच्या वृक्षांवर नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

मागील १५ ते १७ एप्रिल २०२५ दरम्यानची कारवाई

  • झाडांच्या मुळांवरील काढून टाकण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाचा थर : ३३० झाडे
  • खिळे आणि काढून टाकण्यात आलेल्या केबल्सची संख्या : १६७३ झाडे
  • झाडांवर काढून टाकण्यात आलेल्या खिळ्यांचे वजन : १४.६४ किलो
  • फलक काढून टाकण्यात आलेल्या झाडांची संख्या : ४५२ झाडे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -