Share

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवार २० एप्रिल २०२५ रोजी मेगाब्लॉक घेणार आहे. यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील. काही लोकल फेऱ्यांच्या मार्गात बदल केले जातील. काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नसल्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी मुंबई) ते विद्याविहार पर्यंत मेगाब्लॉक
जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगाब्लॉक
ब्लॉक काळात अनेक लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील. काही लोकल फेऱ्यांच्या मार्गात बदल केले जातील. काही लोकल फेऱ्या वीस मिनिटे विलंबाने धावणार आहेत. तसेच ब्लॉक काळात जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. फलाट उपलब्ध नसल्याने करी रोड, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि मशिद स्थानकांवर लोकल उपलब्ध राहणार नाही.

मध्य रेल्वे ट्रान्स हार्बर मार्ग
ठाणे ते वाशी, नेरूळ पर्यंत मेगाब्लॉक
जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक
ब्लॉक काळात ठाणे ते वाशी / नेरूळ / पनवेल मार्गावरील जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द.

बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द

चर्चगेट ते मरीन लाइन्सदरम्यान वानखेडे पादचारी पुलाचा दक्षिण दिशेचा गर्डर उभारण्यासाठी रविवार २० एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री १.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत पश्चिम रेल्वेने विशेष रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी रात्री ८.५० ची बोरिवली-चर्चगेट आणि रविवारी पहाटे ४.३८ ची चर्चगेट-बोरिवली लोकल रद्द राहणार आहे. काही लोकल फेऱ्या अंशत: रद्द राहणार आहेत.

दिवा-मुंब्रादरम्यान दोन रात्री ब्लॉक

मध्य रेल्वेवर दिवा आणि मुंब्रा दरम्यान रेल्वे विद्युतीकरणासंबंधी तांत्रिक कामे करण्यासाठी दोन दिवस रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आहे. सोमवार २१ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री एक ते पहाटे पाच आणि बुधवार २३ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री एक ते पहाटे पाच या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्रकालीन ब्लॉकमुळे दोन्ही दिवस गाडी क्रमांक १५१८१ मऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस सुमारे २५ मिनिटे विलंबाने धावणार आहे. गाडी क्रमांक ११०२० वाराणसी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुमारे १५ मिनिटे विलंबाने धावेल. ब्लॉकवेळेत दिवा आणि ठाणे दरम्यान सहाव्या मार्गावर काही अप मेल गाड्या धावणार आहेत.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

3 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

3 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

3 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

4 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

4 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

5 hours ago