Thursday, May 8, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDhananjay Munde : धक्कादायक, आमदार धनंजय मुंडेंना झाला 'हा' आजार

Dhananjay Munde : धक्कादायक, आमदार धनंजय मुंडेंना झाला ‘हा’ आजार

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell’s palsy) हा आजार झाला आहे. या आजारात चेहऱ्याला पक्षाघाताचा झटका येतो. यामुळे चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. बोलायला त्रास होतो किंवा बोलता येत नाही. अनेकदा हा आजार मर्यादीत कालावधीपुरता त्रासदायक असतो. वेळेत उपचार केले तर या आजारातून बरे होणे शक्य आहे. अनेकदा औषधोपचाराने दोन आठवडे ते सहा महिन्यांच्या कालावधीत रुग्ण बरा होतो.

काँग्रेसचे संग्राम थोपटे भाजपाच्या वाटेवर

धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झाल्याचे सांगितले. उपचार सुरू आहेत पण अद्याप पूर्ण बरा झालेलो नाही, असेही धनंजय मुंडे यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये नमूद केले आहे.

गुन्ह्याची माहिती असताना वैभव नाईक यांनी ती का लपवली? आमदार निलेश राणे यांचा सवाल

आमदार धनंजय मुंडे यांचा विश्वासू म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत आहे. करुणा मुंडे यांच्या वक्तव्यांमुळे धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला धक्का बसल्याची चर्चा आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी हा आजार झाल्याचे वृत्त आले आहे.

मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे कॅमेऱ्यापुढे आलेले नाहीत. त्यांच्या आजाराविषयी उलटसुलट चर्चेला उधाण आले. यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट केली. या पोस्टद्वारे धनंजय मुंडे यांनी त्यांना झालेल्या आजाराची माहिती दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -