Thursday, May 8, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMumbai : माहिमच्या दिलीप गुप्ते यांच्या नावासमोर लेफ्टनंट लिहायचा महापालिकेला विसर

Mumbai : माहिमच्या दिलीप गुप्ते यांच्या नावासमोर लेफ्टनंट लिहायचा महापालिकेला विसर

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने नव्याने रस्त्यांच्या नावाचे फलक लावण्यात येत असून महापालिकेच्या जी उत्तर विभागातील माटुंगा पश्चिम, माहिम भागातील लेफ्टनंट दिलीप गुप्ते यांच्या नावासमोरच लेफ्टनंट लिहायला महापालिका विसरल्याचे दिसून येत आहे. दिलीप गुप्ते मार्गाच्या नामफलकाचे नवीन फलक लावण्यात आले आहे, त्यावर लेफ्टनंद याचा उल्लेखच महापालिकेने केलेला नाही. मात्र, एवढे दिवस झाले फलक लावून, त्यानंतरही महापालिकेच्या लक्षात ही बाब न आल्याने महापालिकेचे अधिकारी काय डोळे बंद करून कंत्राटदार लावत असलेले फलक मान्य करता काय असा सवाल उपस्थित होत आहे.

अग्निसुरक्षेसाठी मुंबई अग्निशमन दल सुसज्ज

दादर शिवाजीपार्क ते माहिम पश्चिम येथे जोडणाऱ्या भागातील एका रस्त्याला महापालिकेच्यावतीने लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग असे नामकरण करण्यात आले होते. त्यामुळे येथील रस्त्यांचे नाव लेफ्टनंट दिलीप गुप्ते असे करण्यात आले असून या रस्त्याचे लेफ्टनंद दिलीप गुप्ते असे असताना नव्याने लावण्यात आलेल्या फलकांवरुन लेफ्टनंट हा शब्दच गायब झालेला पहायला मिळत आहे. त्यामुळे दिलीप गुप्ते कोण याचा विसर पाडायचा प्रयत्न तर महापालिका करत नाही ना असा सवाल स्थानिकांकडून केला जात आहे. दिलीप गुप्ते यांचे बलिदान चिरंतन राहावे म्हणून या रस्त्याला नाव दिले असले तरी लेफ्टनंद शब्द नसल्याने गुप्ते कोण असा प्रश्न आजच्या तरुण पिढीला पडू शकतो.

मुंबईत झाडांचे ऑपरेशन, ३३० झाडांची मुळे झाली मोकळी; १६७३ झाडांना केले वेदनामुक्त

स्थानिक रहिवाशी आणि बालमोहन शाळेच्या माजी विद्यार्थीनी सिमा खोत यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लेफ्टनंट दिलीप गुप्ते यांनी वयाच्या २३ वर्षीच देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या नावाचा यथोचित सन्मान व्हायला हवा. लेफ्टनंद हा लष्करतील त्यांचा हुद्दा आहे. देशासाठी स्वत:च्या प्राणाची बलिदान देणाऱ्या गुप्ते यांचा परमआदर करायला हवा आणि त्यामुळे हे नाम फलक त्वरीत बदलले गेले पाहिजे किंवा ते सुधारीत केले पाहिजे,असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील ९ जलतरण तलावांमध्ये सभासद होण्याची सुवर्णसंधी

कोण आहेत लेफ्टनंद दिलीप गुप्ते ?

दिलीप गुप्ते हे वयाच्या २२ व्या वर्षी सैन्यात सामील झाले होते, आणि फेब्रुवारी १९६४मध्ये त्यांना इंजिनिअर्स कॉर्प्सच्या बंगाल सॅपर्समध्ये नियुक्त करण्यात आले. त्यानंतर १९६५च्या भारत पाकिस्तानच्या युध्दात कारवाईत भाग घेण्यासाठी जम्मू काश्मीर क्षेत्रातील त्यांच्या युनिटमध्ये सामील होण्याचे आदेश मिळाले होते. २३ सप्टेंबर १९६५मध्ये हे युध्द संपले असले तरी त्यानंतरही सीमावर्ती भागात चकमकी सुरुच होत्या. पाकिस्तान तिथवालजवळील जुरा पुलावरून किशनगंगा नदीवर रझाकार आणि मुजाहिदीनच्या वेशात नियमित सैन्य दल भारतात पाठवत होता. ११ ऑक्टोबर १९६५ राजी शत्रूने प्रतिहल्ला आणि एक भयंकर युध्द सुरु झाले. या भयंकर युध्दात लेफ्टनंट गुप्ते, कॅप्टन करुणाकरन, मेजर बिश्त आणि इतर ३९ सैनिकांनी आपले प्राण दिले. लेफ्टनंट गुप्ते यांच्या मानेवर गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर त्यांचा निधन झाले. लेफ्टनंट दिलीप गुप्ते एक शूर आणि वचनबध्द सैनिक होते. आणि त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी भारतीय सैन्याच्या सवौच्च परंपरेचे पालन करून सर्वोच्च बलिदान दिले आणि त्यांच्या बलिदानाची दखल घेवून त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून माहिममधील रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -