Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीJEE Mains Result 2025 : जेईई मेन्स सत्र २ चा निकाल जाहीर

JEE Mains Result 2025 : जेईई मेन्स सत्र २ चा निकाल जाहीर

मुंबई : जेईई मेन्स सत्र -२च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. काल (दि १८) जेईई मेन्स सत्र -२ची उत्तरं प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर आज जेईई मेन्स सत्र -२च्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात २४ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

Best Bus : ‘बेस्ट’ बस का पडतेय आजारी ?

जेईई मेन्स सत्र -२ ची परीक्षा २ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान पार पडली. या परीक्षेनंतर १७ एप्रिलला त्यांची उत्तरं प्रसिद्ध करण्यात आली. मात्र ही उत्तरं काढून टाकण्यात आली. त्यानंतर काल (दि १८) पुन्हा उत्तरं प्रसिद्ध करण्यात आली. आणि आज (दि १९) सकाळी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन्स सत्र -२चा निकाल जाहीर केला आहे. जेईई मेन्स २०२५ च्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी एकूण दहा लाख ६१ हजार ८४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी नऊ लाख ९२ हजार ३५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. त्यातील २४ विद्यार्थ्यांनी १०० गुण मिळवले आहेत. पैकीच्या पकी गुण मिळवणाऱ्या २४ जणांमध्ये २ मुलींचाही समावेश आहे. या मुली जानेवारी महिन्यात झालेल्या जेईई मेन्स सत्र-१ च्या निकालातही अव्वल होत्या. निकाल घोषित झाल्यावर NTA टॉपर्सच्या यादीसह कॅटॅगरीनुसार कट-ऑफ आणि अखिल भारतीय रँकही (AIR ) जाहीर होणार आहे.

असा चेक करा रिझल्ट

सर्वप्रथम jeemain.nta.ac.in या NTA JEE च्या अधिकृत वेबसाइट वर जा.

येथे तुम्हाला होम पेजवर JEE मेन्स निकाल २०२५ ची लिंक दिसेल, तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.

तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

ते डाउनलोड करून ठेवा, भविष्यात त्याचा उपयोग होऊ शकतो

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -