नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस
मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार चर्चा सुरूआहे. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकरने ‘देवमाणूस’ चित्रपटात पहिल्यांदाच लावणी सादर केली आहे. ‘देवमाणूस’च्या निमित्ताने सई पहिल्यांदाच लोककला सादर करताना दिसत आहे. सईची कातिल अदा आणि एनर्जी या गाण्यात विशेष लक्षवेधी ठरली. आता सोशल मीडिया वर सईच्या या लावणीवर बरेच सेलिब्रिटी थिरकताना दिसत आहेत. अनेक सोशल मीडिया स्टार, मराठी कलाकारांनी ‘आलेची मी’ या लावणीवर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे.
Shivaji Satam : सीआयडीमध्ये एसीपी प्रद्युम्न परतणार, खुद्द शिवाजी साटम यांनी दिला इशारा!
अमृता खानविलकरने कोरिओग्राफर आशिष पाटीलच्या सोबत ‘आलेच मी’ गाण्यावर जबरदस्त लावणी केली. ऑफ व्हाइट रंगाची नऊवारी साडी, नाकात नथ आणि मोकळे केस असा लूक करून अमृताने ‘आलेच मी’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा विडिओ आता सगळीकडे चर्चेत आल्याचं दिसून येतंय.
अमृताची एनर्जी पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सईने अमृताच्या डान्सवर “Hayeee!” अशी कमेंटसुद्धा केली आहे. त्यावर अमृताने तिला “ए बेबी…” असा चांगला रिप्लाय केला आहे.
अमृता खानविलकरच्या या डान्स व्हिडिओवर मंजिरी ओक, अनुष्का सरकटे, बेला शेंडे, रोहन प्रधान, लव्ह फिल्म्स यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. तर इतर नेटकाऱ्यानी प्रोत्साहन देत “ताई जेव्हा स्टेजवर येते, तेव्हा तिच एनर्जी असते”, “वाह अमू”, “Og लावणी क्वीन” अशा कमेंट्स चा वर्षावर केला आहे.
View this post on Instagram