पुणे : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई – पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमंडली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूककोंडीत प्रवाशांचे हाल होत आहे.
TATA Hospital : टाटा रुग्णालयातील डॉक्टरांची कौतुकास्पद कामगिरी!
लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मुंबईकर पर्यटक पर्यटन स्थळांवर जाण्यास निघाल्याने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पहाटेपासून वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाट परिसरामध्ये साधारणतः सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा केल्याने मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमंडली आहे.
त्यामुळे गुड फ्रायडेच्या सुट्टीला जोडूनच शनिवार आणि रविवार आल्याने सलग तीन दिवसीय सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी निघालेल्या पर्यटकांचे वाहतूक कोंडी दरम्यान हाल झालेले पाहायला मिळत आहे.