Thursday, May 8, 2025
Homeसाप्ताहिक'ती'ची गोष्टSummer Special Skirts : उन्हाळ्यात परिधान करा हे १० स्टायलिश स्कर्ट्स!

Summer Special Skirts : उन्हाळ्यात परिधान करा हे १० स्टायलिश स्कर्ट्स!

उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येक मुलींना आरामदायी आणि फॅशनेबल पोशाख हवा असतो. खास करून कॉलेज आणि ऑफिसला जाणाऱ्या मुलींचा तो हक्कच असतो! त्यामुळे उन्हाळ्यातील कूल आणि आकर्षक लुकसाठी या १० स्कर्टचे पर्याय आदर्श ठरेल.

फ्लोरल प्रिंट स्कर्ट (Floral Print Skirt)


फ्लोरल प्रिंट असलेले स्कर्ट तुम्हाला फॅशनेबल आणि गोंडस लूक देतात. रंगीबेरंगी फ्लोरल प्रिंटमुळे हा स्कर्ट खूपच सुंदर दिसतो. तुम्ही ते प्लेन टॉप किंवा टी-शर्टने स्टाईल करू शकता आणि आकर्षक लूक तयार करू शकता.

कलर-ब्लॉक स्कर्ट (Color-block Skirt)


कलर-ब्लॉक स्कर्टमध्ये दोन किंवा तीन वेगवेगळ्या रंगांची ब्लॉकिंग केली जाते, ज्यामुळे ते खूप स्टायलिश दिसते. साध्या टॉपसह या प्रकारचा स्कर्ट पेअर करा. त्याच सर्व आकर्षण रंग आणि डिझाईनवर असतं, त्यामुळे टॉप साधा ठेवा. हा स्कर्ट नेहमीच आकर्षक आणि ट्रेंडी दिसतो.

लांब फ्लोइंग स्कर्ट (Long Flowing Skirt)


लांब फ्लोइंग स्कर्ट आरामदायक आणि आकर्षक असतात. उन्हाळ्यात हलके आणि फ्लोई लुक देण्यासाठी हे आदर्श पर्याय आहेत. साधा किंवा फ्रिल असलेला टॉप वापरून एक लांब फ्लोइंग स्कर्टसह पेअर करता येईल.

को-ऑर्ड सेट स्कर्ट (Co-ord Set Skirt)


को-ऑर्ड सेटमध्ये स्कर्ट आणि टॉपचा एकत्रित कॉम्बिनेशन मिळतं. हे दोन्ही एकाच कापड किंवा रंगांमध्ये असू शकतात. वेस्टर्न किंवा इंडो-वेस्टर्न लूकसाठी हे एक उत्तम पर्याय आहे.

फ्लेर्ड स्कर्ट (Flayed Skirt)


फ्लेर्ड स्कर्ट हा एक आकर्षक आणि फॅशनेबल पर्याय आहे जो तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात एक सुंदर आणि थंड लूक देतो. तुम्ही ऑफिसला किंवा पार्टीसाठी परिधान करू शकता.

डेनिम स्कर्ट (डेनिम स्कर्ट)


हा स्कर्ट डेनिम फॅब्रिकपासून बनवला आहे, जो तो मजबूत आणि आरामदायी असतो. तुम्ही कोणत्याही प्रसंगी डेनिम स्कर्ट घालू शकता, मग ते कॉलेज असो, ऑफिस असो किंवा कॅज्युअल आउटिंग असो. तुम्ही तुमच्या आवडत्या टॉप किंवा टी-शर्टने ते स्टाईल करू शकता.

मॅक्सि स्कर्ट (Maxi Skirt)


मॅक्सि स्कर्ट्स अंगावर बसतात आणि पायांपर्यंत लांब असतात. विविध रंग, प्रिंट आणि डिझाईन्समध्ये ते उपलब्ध आहेत. हा स्कर्ट तुम्ही हाय-नेक टॉप, क्रॉप टॉप किंवा शर्टसह स्टाइल करा.

लिनन स्कर्ट (Linen Skirt)


लिनन स्कर्ट उन्हाळ्यातील सर्वाधिक लोकप्रिय पर्याय आहे. लिनन फॅब्रिक आरामदायक राहण्यास मदत करते. हा स्कर्ट शर्ट, टीशर्ट किंवा क्रॉप टॉपसह पेअर करा.

हायवेस्ट स्कर्ट (High waist skirt)

सध्या जीन्स आणि स्कर्टमध्ये हायवेस्टची फॅशन आहे. मात्र या स्कर्टसोबत हायनेक क्रॉप टॉप मस्त दिसतात. हाय हिल्स कॅरी करा ज्यामुळे तुम्ही अगदी परफेक्ट दिसाल.

प्लेटेड स्कर्ट (Pleated Skirt)

प्लेटेड स्कर्टमध्ये, फॅब्रिकला घडी तयार केली जाते, ज्यामुळे त्याला एक अनोखा आणि आकर्षक लूक मिळतो. आजकाल, हा स्कर्ट ट्रेंडमध्ये आहे आणि कॉलेज आणि ऑफिसला जाणाऱ्या मुलींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -