Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीPF KYC Update : पीएफ अकाऊंटचे KYC अपडेट कसं करायचं?

PF KYC Update : पीएफ अकाऊंटचे KYC अपडेट कसं करायचं?

मुंबई : तुमचे पीएफचे पैसे अडकलेत, कारण KYC अपडेट झालेली नाहीये? काळजी करू नका! आता तुम्ही स्वतः ऑनलाईन KYC करू शकता. तेही फक्त १० सोप्या स्टेप्समध्ये! आपल्यापैकी अनेक जणांना पीएफचा पैसा काढायचा आहे, पण त्यांची KYC पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पीएफचे पैसे काढण्यासाठी त्यांना अडचणी येत आहेत. पीएफला केवायसी अपडेट कसे करायचे, असा प्रश्न अनेकांना पडतोय.

त्याची माहिती आपण दहा स्टेप्समध्ये जाणून घेऊ पुढीलप्रमाणे –

१. सर्वात आधी तुम्हाला सर्च ब्राऊझरवर Login Epfo असं सर्च करा.

२. त्यानंतर तुम्हाला employee provident fund ची वेबसाईट आली असेल. त्यावर क्लिक करा.

३. आता तुमच्यासमोर होम पेज ओपन झालं असेल. त्यावर समोर तुम्हाला KYC Updation यावर क्लिकवर करा.

४. त्यानंतर आता तुम्हाला UAN नंबर आणि पासवर्ड टाकून Captcha कोड भरायचा आहे. त्यानंतर साईन इन करून घ्या.

५. साईन इन केल्यावर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी गेला असेल. तो इथे भरा.

६. त्यानंतर पुन्हा एक पेज आलं असेल. त्यात तुम्हाला तुमची माहिती समोर दिसली असेल. आता तुम्ही मॅनेज या पर्यायावर क्लिक करा.

७. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या क्रमांकावर KYC चं ऑप्शन आलं असेल.

८. त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक पेज ओपन होईल. आता इथे तुम्हाला नेमकं केवायसी कशाची करायची आहे. जसे की, बँक अकाऊंट, पॅन कार्ड, पासपोर्ट ते सिलेक्ट करा. आपल्याला बँक खात्याची केवायसी करायची असल्याने आपण इथे बँक निवडू.

९. आता तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन झाला असेल. त्यावर तुम्हाला तुमचं नाव दिसेल. आता तुम्हाला जो बँक अकाऊंट पीएफ खात्याला केवायसी करायचा आहे तो नंबर इथे टाका. त्यानंतर IFSC कोड भरा आणि टर्म अॅण्ड कंडिशनला ओके करून सेव्ह करा.

१०. त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमाकांवर एक ओटीपी येईल. तो इथे भरा आणि सबमिट करा.

बस! एवढं केल्यावर तुमचं PF KYC अपडेट झालं असेल. ही प्रोसेस तुम्हाला पैसे काढण्यासाठी किंवा ट्रान्सफरसाठी आवश्यक आहे, त्यामुळे वेळ न दवडता आजच अपडेट करा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -