नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनावर भाजपाचे टीकास्त्र

Share

मुंबई : नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचा कडवा विरोध असून काँग्रेसचे हे आंदोलन बेगडी असल्याचे टीकास्त्र भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी बुधवारी सोडले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

यावेळी प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. काँग्रेसला आंदोलनाचा अधिकार आहे मात्र कोणाचीही जमीन आणि निधी लुटण्याचा अधिकार नाही अशा शब्दांत श्री. पाटील दानवे यांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला .

यावेळी नॅशनल हेराल्ड प्रकरणाचे वास्तव समोर मांडताना श्री. पाटील दानवे म्हणाले की, 1937 साली उदात्त हेतूने 5 हजार स्वातंत्र्यसैनिकांनी सुरू केलेले हे वर्तमानपत्र आणि संबंधित कंपनी कधीही नेहरू, गांधी कुटुंबाची जहागीर नव्हती. नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्रावर किंवा त्यांच्या मालमत्तेवर गांधी कुटुंबाची मालकी होती,अशा प्रकारची नोंद कुठेच नाही. त्यांना कायदेशीर अधिकार नाही. नॅशनल हेराल्डची मोठी मालमत्ता गिळंकृत करण्याचा कट काँग्रेसने रचून ‘यंग इंडिया’ नावाची कंपनी स्थापन केली आणि मालमत्तेचा दुरोपयोग करण्यात आला असा घणाघाती आरोप श्री. पाटील दानवे यांनी केला.

कालांतराने 2008 साली आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्यामुळे या वर्तमानपत्राचे प्रकाशन थांबले. तेव्हा काँग्रेस पक्षाने ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ या कंपनीला 90 कोटींचा निधी दिला. खरेतर कोणत्याही खासगी संस्थेला पक्षाचा निधी देणे हे बेकायदेशीर असूनही काँग्रेसने हा निधी दिला असेही श्री. दानवे पाटील यांनी नमूद केले. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 साली काँग्रेस नेत्यांवर ‘आर्थिक फसवणुकीचा’ आरोप करत एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेमध्ये ‘यंग इंडिया प्रायव्हेट लिमीटेड’ने कवडीमोल रकमेत 90.25 कोटी रुपये वसूल करण्याचा उपाय काढला, जो ‘नियमांच्या विरोधात’ जाणारा आहे असे म्हटले होते. आता या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार सरकारी यंत्रणेने चौकशी केली असून पुढची कारवाई सुरू आहे असेही श्री. पाटील दानवे म्हणाले.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

4 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

4 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

5 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

5 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

5 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

6 hours ago