आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या पत्नीने मुलाच्या आरोग्यासाठी तिरुपती बालाजीला साकडे घातले होते. त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी तिरूमला मंदिरात केस कापून मुंडण केले. यावेळी त्यांनी भगवान व्यंकटेश्वरांची मनोभावे प्रार्थना केली. यावेळी मंदिरातील अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्येही त्यांनी सहभाग नोंदवला.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या पत्नीने रविवारी (दि. १३) तिरूमला मंदिरात आपले केस कापून मुंडण करत देवाला दिलेला शब्द पूर्ण केला. गेल्या काही दिवसांपूर्वी सिंगापूरमधील एका शाळेत आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत त्यांचा मुलगा जखमी झाला होता. त्याच्या सुरक्षेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी त्यांनी व्यंकटेश्वरा स्वामींकडे प्रार्थना केली होती. अन्ना कोनिडेला यांनी देवाप्रती आपली कृतज्ञतेच्या प्रतिकाच्या स्वरूपात आपले केस अर्पित करून व्यकेटेश्वराला धन्यवाद दिले.
जनसेना पक्षाने जारी दिलेल्या माहितीनुसार,उपमुख्यमंत्री कल्याण यांच्या पत्नी अण्णा कोनिडेला यांनी प्रतिज्ञा केली होती की जर त्यांचा मुलगा अपघातातून वाचला तर ती देवतेला आपले केस अर्पण करेल. अपघातात जखमी झाल्यानंतर आता त्यांचा मुलगा बरा आहे, त्यामुळे अण्णांनी आपले डोके मुंडून करून आपले व्रत पूर्ण केले आहे. अण्णा यांनी मंदिराच्या परंपरेनुसार ‘पद्मावती कल्याण कट्ट्यावर’ आपले केस अर्पण केले. अण्णा कोनिडेला ही एक रशियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन आहे, म्हणून तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) च्या नियमांनुसार, तिने प्रथम मंदिर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भगवान वेंकटेश्वरावर विश्वास जाहीर केला आणि घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. नंतर त्यांनी मंदिराला भेट दिली आणि विविध विधींमध्ये भाग घेतला.
पवन कल्याण यांचा मुलगा मार्क शंकर सिंगापूरमध्ये एका समर कँम्पमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. जिथे ८ एप्रिल रोजी आग लागली. या आगीच्या घटनेत त्याचे हात आणि पाय भाजले गेले आहेत. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला होता. या दुर्घटणेत जखमी मुलाच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी अन्नाने तिरूमला मंदिरात केस अर्पण करण्याची प्रार्थना केली होती.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…