उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकजण आपल्या त्वचेची आणि त्याचबरोबर शरीराची काळजी घेण्यास सुरूवात करतात. पण या कडक उन्हाळ्यात त्वचेबरोबर केसांचीही काळजी घ्यावी लागते. वाढत्या उन्हामुळे पुर्ण शरीर घामाने ओलं होत असतं. त्याच पद्धतीने केसांमध्ये सुद्धा प्रचंड घाम यायला सुरुवात होते. तीव्र प्रकाश, वातावरणातील बदल, गरम हवामान आणि घाम यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि कमकुवत होऊ शकतात. याशिवाय डोक्यातील कोंडा, केस गळणे आणि तेलकट टाळू यासारख्या समस्या देखील वाढू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात केसांची काळजी घेणे खूप महत्वाचं आहे. जेणेकरून त्यांचे आरोग्य अबाधित राहील. त्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा केसांची विशेष काळजी घेतली तर उन्हाळ्यातही तुमचे केस रेशमी, मुलायम आणि निरोगी राहू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी हे सांगणार आहोत, जेणेकरून ते दीर्घकाळ सुंदर आणि मजबूत राहतील.
उन्हाळ्यात केस जास्त घट्ट बांधून ठेवणं टाळलं पाहिजे. तसेच तुम्ही केसांना हेअर स्प्रे, जेल किंवा विविध क्रिम ज्याने तुमचे केस गळणार नाहीत आणि कोरडे होणार नाहीत अशा प्रोटक्ट्सचा वापर करा. तसेच तुम्ही केस धुताना कंडीशनरचा जास्त प्रमाणात वापर करू शकता. तुम्ही उन्हाळ्यात जास्त वेळ बाहेर प्रवास करत असाल तर टोपी किंवा स्कार्फचा वापर नक्की करा. सुर्याच्या तापत्या किरणांपासून केसांना नेहमी वाचवण्याचा प्रयत्न करा.
उन्हाळ्यात तुम्ही जेव्हा घरा बाहेर पडता तेव्हा केसांना येणारा घाम आणि धूळ केसांना लवकर खराब करते. ज्यामुळे टाळू पूर्णपणे तेलकट आणि केस चिकट होतात. म्हणून आठवड्यातून किमान २-३ वेळा सौम्य शाम्पूने केस धुवा. केस जास्त कोरडे होऊ नयेत म्हणून सल्फेट-फ्री शाम्पू वापरा. केस धुण्यासाठी कोमट किंवा थंड पाणी वापरा कारण गरम पाणी तुमच्या केसांना कमकुवत करू शकते.
हीट स्टाइलिंग असलेले हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, कर्लिंग आयर्न यासारखे उत्पादनांचा वापर केल्यास केस कोरडे आणि कमकुवत होऊ शकतात. जर अगदी गरज असेल तर केसांना स्प्रे लावल्यानंतरच त्यांचा वापर करा. हेअर ड्रायर वापरण्याएवजी केस नैसर्गिकरित्या सुकवण्याची सवय करा.
कितीही घाम आला तरीही सतत केस धुतल्यास, नैसर्गिक तेल निघून जाते. आठवड्यातून केवळ ३ वेळा केस धुवा. इतर दिवशी तुम्ही ड्राय शँपू अथवा कोरफड जेलचा वापर करून केसांची काळजी घेऊ शकता. रोज केस धुणे टाळा.
उन्हाळ्यात केसांना तेल लावा, केसांसाठी बदाम तेल, नारळ तेल, किंवा तिळ तेल फायदेशीर ठरू शकते. हे तेल केसांच्या मुळांना पोषण देते आणि त्यांना हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
बऱ्याचदा उन्हाळयात लांब केसांचा व्यत्यय नको म्हणून बहुतांश मुली घट्ट अंबाडा किंवा करकचून वेणी बांधतात. यामुळे केसांच्या मुळांवर ताण पडून ते तुटू शकतात. त्यामुळे कधीही सैल वेणी तसेच मेसी बन सारखे हेअरस्टाइल करा. जेणेकरून केसांमध्ये हवा खेळती राहील यामुळे ते मोकळा श्वास घेऊ शकतील.
या हंगामात केसांच्या आरोग्यासाठी आहारामध्ये व्हिटॅमिन C, आयर्न, आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. यासाठी पोषक तत्वे मिळविण्यासाठी अंडी, मसूर, दूध आणि सोयाबीनचे सेवन करा. ओमेगा-३ फॅटी अॅसिडसाठी अक्रोड, जवस, मासे यांचे सेवन करत राहावे. केसांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि डिहायड्रेशन टाळा.
(टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…