भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रासाठी राबविण्यात येणारी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (Surya Water Supply Project) येत्या सहा महिन्यात पुर्ण होऊन नागरिकांना दिवाळीपर्यंत २४ तास पाणीपुरवठा होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी योजनेच्या पाहणी दौऱ्याच्या प्रसंगी व्यक्त केल्याने आता प्रकल्पाच्या पूर्णत्वाला दिवाळीचा मुहूर्त मिळाला आहे.
मीरा -भाईंदर महापालिका क्षेत्रासाठी २१८ दशलक्ष लिटर प्रति दिन पाणीपुरवठा करणारी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेली ५ वर्षे रखडली होती. परंतु सातत्याने पाठपुरावा केल्याने या योजनेचे तांत्रिक काम जवळजवळ पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के काम येत्या ६ महिन्यात पूर्ण होईल असे प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले असुन मीरा-भाईंदर महापालिका वासियांना शुद्ध, २४ तास पिण्याचे पाणी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. वसई काशिद कोपर ते चेने जलकुंभापर्यंत सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम ,वसई खाडी छेदून जलवाहिनी टाकण्याचे काम, कवडास येथील उच्च दाब विद्युत वाहिनीचे काम, चेने वनविभागाच्या हद्दीतील जलवाहिनी, चेने येथील खासगी जागेतील पुलाचे काम ,चेने येथील जलकुभांचे कामे या सर्व रखडलेल्या कामाचा आढावा घेऊन मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उपरोक्त कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. (Surya Water Supply Project)
गेली काही वर्ष रेंगाळलेल्या या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील लोकांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या बनला आहे. या पाणीपुरवठा योजने बाबत मी लोकप्रतिनिधी असल्यापासून सातत्याने पाठपुरावा करत आलो असून आता राज्याचा मंत्री या नात्याने माझी जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करून मीरा भाईंदर वासीयांना २४ तास शुध्द पेयजल पुरवठा करण्याचे अभिवचन पुर्ण करण्याचा आपला मानस असल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. (Surya Water Supply Project)
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…