वाराणसी (उत्तर प्रदेश) : वाराणसी जिल्ह्यात मानवता हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका १९ वर्षीय तरुणीवर सात दिवसांच्या कालावधीत तब्बल २३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या दरम्यान ती मदतीसाठी मित्रांकडे गेली असता त्या नराधमांनीही आपल्या अन्य मित्रांसोबत तिच्यावर अत्याचार केले. २९ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान आरोपींनी तिला विविध हॉटेल्स, कॅफे आणि हुक्का बारमध्ये नेऊन अमानुष पद्धतीने अत्याचार केला.
पीडित मुलीने कसेबसे आरोपींच्या तावडीतून सुटून घरी पोहोचताच, तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सहा आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७०(१) (सामूहिक बलात्कार), ७४ (विनयभंग), १२३ (विष वा नशा देणे), १२६(२), १२७(२), आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त विदुश सक्सेना यांनी सांगितले की, पीडित तरुणी २९ मार्च रोजी काही मित्रांसोबत बाहेर गेली होती. त्यानंतर ती घरी परतली नाही. ४ एप्रिल रोजी तिच्या कुटुंबियांनी हरविल्याची तक्रार दिली. पुढील चौकशीत तिच्यावर सात दिवसांदरम्यान विविध ठिकाणी क्रूरतेने अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.
सुरुवातीला ती एका मैत्रिणीकडे गेली असताना एक आरोपी तिला लंका परिसरातील एका कॅफेमध्ये घेऊन गेला आणि बलात्कार केला.
दुसऱ्या दिवशी रस्त्यात भेटलेल्या आणखी दोन जणांनी तिला नादेसर परिसरात नेऊन पुन्हा अत्याचार केला.
त्यानंतर तिला तिसऱ्याने एका कॅफेमध्ये नेले, जिथे आधीच पाच जण होते. तिला नशेचे औषध दिले गेले आणि सर्वांनी बलात्कार केला.
१ एप्रिल रोजी दुसऱ्या एका आरोपीने तिला हॉटेलमध्ये नेले, जिथे तिला “क्लायंटसाठी मालिश” करण्यास सांगून अत्याचार केला गेला.
यानंतर, तिला औरंगाबादजवळील एका गोदामात नेऊन तिघांनी पुन्हा बलात्कार केला.
तिथून सुटून ती सिग्रा येथील मॉलबाहेर बसली असताना, पुन्हा एका व्यक्तीने खाण्याचे आमिष देत तिला नशा देऊन अस्सी घाट येथे नेले आणि अत्याचार केला.
तिथून सावरून ती एका मित्राकडे गेली, पण तिथेही तिच्यावर बलात्कार झाला. अखेर ती तिथून पळून जाऊन घरी परतली.
सध्या पीडितेची वैद्यकीय तपासणी झाली असून, तिचे मनोबल व मानसिक आरोग्य यासाठी सल्लागारांची मदत घेतली जात आहे.
पोलिसानी या प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत इतर आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक कार्यरत केले आहे.
दरम्यान, ही घटना केवळ कायद्यासमोर आव्हान नाही, तर समाज म्हणून आपण कुठे आहोत याचा आरसा ठरते. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि समाजाने एकजुटीने भूमिका घ्यावी, हीच अपेक्षा.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…