पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…

Share

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

या सृष्टीमध्ये देवाने प्रत्येकाला आपापले आयुष्य दिले. जीव जन्माला घातला. पण त्या नियती किंवा निसर्गाकडून काहींना थोडंफार कमी जास्तही केलं. उदा. माता-पिता दोन्ही सुदृढ, सामान्य, प्रतिभावान, बुद्धिमान असले तरीही त्यांच्या उदरी एखादं मूल मतिमंद, दिव्यांग जन्माला येते. त्याची मानसिक, शारीरिक, कौटुंबिक कारणे आहेत. अशा मुलांवर उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. त्यांनाही चारचौघात मिसळणे शक्य नसते. पण माणूस हा सामाजिक प्राणी असल्याने एकमेकांत जाणं, खेळणं, वागणं, बागडणं आवडतं; परंतु त्यांना काही गोष्टी बौद्धिक, शारीरिक क्षमता व कुवत नसल्याने विविध गोष्टी घडतात, यालाच बुद्ध्यांक किंवा ऐक्यू म्हणतात. यावरूनच त्यांचे मंदत्व किती अंशी आहे हे सिद्ध होते. ही टक्केवारी निदर्शनास येते त्यासाठी समुपदेशन आणि वैद्यकीय तपासण्या, उपचार यातून काही प्रमाणात यश मिळते पण समाजात अशा मुलांच्या आई-वडिलांना मात्र यातून खूप सोसावे लागते, समस्यांना सामोरे जावे लागते. मोठ्या प्रमाणावर जबाबदारी वाढते ते चिंताग्रस्त होतात. पण शेवटी आपल्या हातात जे आहे तितके तरी करूयात. धीर देणे, आधार, पाठबळ देणं, भावनिक साथ देणं, कौतुक, प्रोत्साहन प्रसंगी देणं ही गोष्ट तितकीच महत्त्वाची नाही का!

माणसाचं जीवन हल्ली धक्कादुखीचे झाले आहे. काहीतरी विरंगुळा म्हणून जेवणानंतर सगळेच फेरफटका मारायला बागेत जमले होते. उत्साह, छंद सगळ्यांचाच असतो.

संध्याकाळी अशीच बागेत फेरफटका मारण्यासाठी गेले होते. तिथे एक मुलगा खूप ओरडत होता. त्याचे ७० वर्षांचे वडील ४० वर्षांच्या मुलाचा हात पकडून बागेत फिरवत होते. कोणालाही पाहिलं की गाणं म्हणत ओरडत चालला होता. कारण त्याला इतकसं काही कळत नव्हतं. त्यात वडिलांचे किराणामालाचे दुकान होते. दुकान बंद करून ते जास्तीत जास्त लवकर येण्याचा प्रयत्न करून त्याला फेरफटका मारण्यासाठी घेऊन जात. तो दिवसभर मुलगा घरामध्ये काय करणार? अशा वेळी माझ्या मनात एकच प्रश्न पडला की, “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा”

अशीच एक गोष्ट आहे माझ्या एका अत्यंत जवळच्या मैत्रिणीची मुलगी सुद्धा २१ वर्षांची झाली. जाणतं वय आलं. पण तिला कुठे आश्रमात सोडू शकत नाही. एकटीला सोडू शकत नाही. बरं तिचे वडील आजारी. अशावेळी त्या मुलीचं काय करायचं, घरी वडीलधारी मंडळी नाहीत, लहान बहीण आहे ती शाळेत जाते. मग या मुलीवर लक्ष कसे ठेवणार? तिचं तिला कधी कधी भान सुटतं. भांडी फोडते, ओरडते स्पेशल चाइल्ड शाळेत घातले. महिना महिनाभर शाळेत जायचं नाही. बाईंनी काही बोललं की रुसायचं. खूप शहाण्यासारखं तर कधी वेड्यासारखं वागायचं. या मुलांचं पाहिलं तर बुद्ध्यांक थोडा कमी असतो. त्यांना समजून फक्त आईच घेऊ शकते. पण आई मात्र २४ तास बरोबर राहू शकत नाही. तिलाही तिची कामे, उदरनिर्वाह, चणचण, आरोग्य, घरच्या जबाबदाऱ्या आणि इतर सर्वत्र पाहण्याची गरज असते.

अशा मुलांसाठी योग्य वेळी मार्गदर्शन करण्याची गरज असते. उदा घ्यायचं झालं तर अशा मुलांना सांभाळताना पालकांना मात्र मोठी शिक्षा होते. आपण रेल्वे स्टेशनवर किंवा रस्त्यावर जेव्हा ही मुलं चालत असताना त्यांचे लक्ष कुठे असतं मग पालक त्यांना खेचतात. अगदी रस्त्यावरून चालताना सुद्धा रस्ता भरधाव गाडीपासून संरक्षण करायचं असतं. पण त्यांना काही सुधरत नाही. अशावेळी पालकांच्या मनात विचार येतो की, जन्माला घालून केवढी मोठी शिक्षा झाली आहे. एवढं मोठं मूल सांभाळणं, परत त्याच्या वाढत्या वयाबरोबर वाढते प्रॉब्लेम्स, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक समस्या यांनाही तोंड द्यावेच लागते. खरी कसरत होते आई-वडिलांची. पोटचं मूल असतं ते आईला तितकंच प्रिय असतं. तरी आई त्या मुलाला जास्तीत जास्त जीव लावून त्याची काळजी घेत असते. वडीलसुद्धा त्याचे संगोपन करत असतात. आपण एक जीव जन्माला घातलेला आहे. मग त्याचे संगोपन, पालनपोषण, शिक्षण ही जबाबदारी ओझं न वाटता पार पाडली जावी याकडेच त्यांचा कल असतो. खूप माणसं अशी मी पाहिली आहेत की ते जीव लावून आपली जबाबदारी निभावत असतात. अशावेळी पालकांची चिडचिड, ओढाताण, ससेहोलपट सारं निमुटपणे सहन करत सहनशील बनतात पण एकाच वेळी अनेक प्रचंड जबाबदाऱ्या, मानसिक ताण अशा पालकांना सुद्धा कौन्सिलिंगची गरज असते. जीवनात येणाऱ्या टप्प्यावर त्यांनाही धीर, आधार हवा असतो. त्यांचे मन खचलेलं असतं. अति काळजी, दडपण, भीती, नैराश्य आणि पुढे उतारवयात किंवा आपल्यानंतर काय होणार? कोण सांभाळणार? भविष्यकाळाची चिंता भेडसावत असते. खरंतर यावर फार मोठा प्रश्नचिन्ह असला तरी तेही जीवनच आहे. जगायला हवे साथ न सोडता !आपणच जन्म दिलेल्या लेकराला सांभाळून पुढे पुढे चालायला हवे. तेही हिमतीने इतकच म्हणेल.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

2 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

3 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

3 hours ago