Friday, May 9, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वGOLD : रामनवमीचा योग साधून सोनं खरेदी करणार आहात ? मग जाणून...

GOLD : रामनवमीचा योग साधून सोनं खरेदी करणार आहात ? मग जाणून घ्या आजचा सोन्याचा दर

मुंबई : रामनवमीचा योग साधून रविवारी सुटीच्या दिवशी सोनं खरेदीचा विचार करत असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी. आज मुंबईत २४ कॅरेट शुद्ध सोनं प्रति तोळा (१० ग्रॅम) ९० हजार ६६० रुपये आहे. तसेच आज मुंबईत २२ कॅरेट शुद्ध सोनं प्रति तोळा (१० ग्रॅम) ८३ हजार १०० रुपये आहे.

US Tariff : अमेरिकेच्या टॅरिफ धोरणात भारताला आणखी सवलत मिळणार ?

सोन्याप्रमाणेच रामनवमीचा योग साधून रविवारी सुटीच्या दिवशी चांदी खरेदीचा विचार करत असलेल्यांची संख्याही मोठी आहे. अशा मंडळींसाठी महत्त्वाची बातमी. आज मुंबईत १० ग्रॅम चांदी ९४० रुपये, १०० ग्रॅम चांदी ९४०० रुपये आणि एक किलो चांदी ९४ हजार रुपये या दराने उपलब्ध आहे.

अमेरिकेने जगातील अनेक देशांसाठी नवे टॅरिफ धोरण लागू केले आहे. या धोरणामुळे अनेकांनी गुंतवणुकीचा सुरक्षित आणि उत्तम पर्याय म्हणून सोनं आणि चांदी यांच्याकडे बघायला सुरुवात केली आहे. यामुळे सोन्याचांदीच्या दरांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. पुढील काही महिन्यांत प्रति तोळा सोनं एक लाख रुपयांच्या घरात जाईल असा अंदाज व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक गुंतवणूक तज्ज्ञ नागरिकांना गुंतवणुकीसाठी सोन्याचांदीचा गांभिर्याने विचार करण्याचा सल्ला देऊ लागले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -