पणजी: सिंधुदुर्ग ते पुणे थेट विमानसेवा पुन्हा सुरु झाली आहे. गोव्यातील फ्लाय – ९१ या कंपनीने दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी (०१ एप्रिल) पासून ही विमानसेवा सुरु केली आहे. आठवड्याचे पाच दिवस ही विमानसेवा सुरु असेल.
फ्लाय – ९१ कंपनीने मंगळवारी (०१ एप्रिल) पासून सिंधुदुर्ग – पुणे – सिंधुदुर्ग विमानसेवा सुरु करण्यात आली. पुण्यातून सकाळी ७.५० वाजता सुटलेले विमान सकाळी ९.१० वा सिंधुदुर्ग विमानतळावर दाखल झाले. या विमानसेवेमुळे सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या प्रवाशांना लाभ होणार आहे.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ ते पुणे विमानतळ सोमवार आणि शुक्रवार वगळता आठवड्याचे पाच दिवस विमानसेवा सुरु राहणार आहे. फ्लाय – ९१ या कंपनीने कंपनीच्या संकेतस्थळावरुन फ्लाईट बुकिंगला सुरुवात केली आहे. तांत्रिक अडचणीमुळे ही विमानसेवा बंद करण्यात आली होती. अखेर दोन महिन्यानंतर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. कंपनीने लवकरच मुंबई ते सिंधुदुर्ग देखील विमानसेवा लवकरच सुरु करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्ग – पुणे विमानाने प्रवास करण्यासाठी तुम्हाला २,९४१ रुपये मोजावे लागतील. यात विविध कर वाढण्याची शक्यता आहे. नमूद करण्यात आलेला दर कंपनीच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. गोव्यात येण्यासाठी फ्लाईट चुकल्यास अथवा विमानभाडे परवडत नसल्यास पर्यटकांना चिपी विमानतळावरुन गोव्यात येणे सोप्पं होणार आहे. शिवाय सिंधुदुर्गसह गोव्यातील पर्यटनासाठी आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…