Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीWeather : कुठे उष्णतेची लाट तर कुठे गारपीटीचा इशारा! पाहा कसे असेल...

Weather : कुठे उष्णतेची लाट तर कुठे गारपीटीचा इशारा! पाहा कसे असेल आजचे हवामान

मुंबई : मागील दोन दिवसांपासून राज्यभरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी (Rain Alert) कोसळ्याचे दिसून आले. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आजही देशभरात हवामानाचे दुहेरी स्वरूप दिसून येत आहे. हवामान विभागाकडून (IMD) एकीकडे मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे तीव्र उष्णतेचा (Heat Wave) इशारा देण्यात आला आहे. (Weather Update)

IPL 2025: जसप्रीत बुमराह कधी करणार पुनरागमन?

हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रापासून कोमोरिन क्षेत्रातून कमी पातळीपर्यंत चक्राकार अभिसरणाच्या स्वरूपात वाऱ्यांचा उत्तर-दक्षिण प्रवाह सुरू आहे. यामुळे, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारे दमट वारे खालच्या पातळीवर एकमेकांवर आदळत आहेत. या हवामान गतिविधींमुळे, छत्तीसगड, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तेलंगणाच्या विविध भागात ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळ आणि गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहेच्या वेगवेगळ्या भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.

तर मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे या भागातील उभ्या गव्हाच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, ओडिशा, कोकण आणि गोवा, कर्नाटकचा किनारी भाग, पश्चिम बंगालमधील गंगेचे मैदान, गुजरातच्या विविध भागात जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Weather Update)

उत्तर भारतात तापमान दोन ते तीन अंशांनी वाढेल

गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात हवामानाचा पारा वाडत असल्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पारा आणखी वाढू शकतो आणि तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ होऊ शकते. यामुळे उत्तर भारतातील बहुतेक भागात पुढील चार ते पाच दिवसांत पारा ४० अंशांच्या पुढे जाऊ शकतो, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

राजस्थानमध्ये पसरणार उष्णतेची लाट

राजस्थानमध्ये हवामानाचा पाराने उच्चांक गाठला असून ५ ते ७ एप्रिल दरम्यान पश्चिम राजस्थानमध्ये उष्ण वाऱ्यांसह उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, ३ आणि ४ एप्रिल रोजी, ईशान्येकडील बहुतेक भागात उष्ण आणि दमट हवामानाचा लोकांना नाहक त्रास होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -