Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीGhibli Alert : घिबली फोटो करताय; सावध रहा! एक क्लिक अन् बँक...

Ghibli Alert : घिबली फोटो करताय; सावध रहा! एक क्लिक अन् बँक खाते रिकामे

मुंबई : सध्या भारतभर घिबली (Ghibli) फोटोचा मोठा ट्रेंड सुरु झाला आहे. जपानी चित्रशैलीमध्ये आपले फोटो तयार करण्यासाठी लोकांची अक्षरशः ऑनलाईन झुंबड उडत आहे. सर्वसामान्यांपासून अभिनेते तसेच राजकीय नेत्यांनी देखील या घिबली चित्रांचा मोह आवरत नाही. मात्र नाण्याला जसं दोन बाजू असतात त्याचप्रमाणे घिबली चित्रशैलीला देखील दोन बाजू आहेत. एकीकडे घिबलीमुळे जगभरातील अनेक लोक त्याची वाहवा करत आहेत. मात्र दुसरीकडे तंत्रज्ञान एक्सपर्ट्सनी नागरिकांना घिबलीपासून सावधानतेचा इशारा दिला आहे. (Ghibli Alert)

Fawad Khan : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान पुन्हा हिंदी सिनेमात दिसणार, मनसेचा संताप

टेक्नोसेव्ही जगात सायबर चोरटे लोकांना लुटण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. त्यातच सोशल मीडियावर घिबली फोटो तयार करण्याचा ट्रेंड सुरु असल्याचा फायदाही सायबर चोरटे घेत आहेत. चॅट जीपीटीमार्फत एका दिवसात फोटो तयार करताना मर्यादा लागत आहेत. त्यामुळे अनेकजण घिबली स्टाइल फोटो तयार करण्याचा नादात इतर वेबसाईटचा वापरत करत आहेत. मात्र यामुळे मची संपूर्ण माहिती सायबर स्कॅमर्सपर्यंत पोहोचत आहे. हीच बाब तुमच्यासाठी धोक्याची आहे.

ChatGPT व्यतिरिक्त अनेक अ‍ॅप आणि पोर्टल Ghibli स्टाइल फोटो तयार करण्याचा दावा करत आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून स्कॅमर्स बनावट वेबसाइट तयार करून फसवणूक करू शकतात. चॅटजीपीटी ऐवजी दुसरी वेबसाइट आणि टूल्सचा वापर करून Ghibli फोटो तयार करत असाल तर सतर्क राहण्याची गरज आहे. कारण बनावट वेबसाईटद्वारे केवळ फोटो नव्हे तर फेशियल डिटेल्स म्हणजेच चेहऱ्याची ओळख दिली जात आहे. फेशियल डिटेल्सच्या माध्यमातून अनेकांचा फोन अनलॉक होतो. या माहितीच्या आधारे स्कॅमर्स फोन अनलॉक करून आर्थिक फसवणूक करु शकतात. तसेच यामुळे वेगवेगळ्या डिजिटल सर्व्हिसचा वापर करू शकतात. एकंदरीत फेशियल डिटेल्समुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे घिबलीचा फोटो तयार करताना लोकांनी वेळीच सावध राहणे गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -