Friday, May 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजWalmik Karad Update : वाल्मिक कराडचे फिल्म इंडस्ट्रीशी जुने संबंध

Walmik Karad Update : वाल्मिक कराडचे फिल्म इंडस्ट्रीशी जुने संबंध

बीड : मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येच्या कटात मास्टर माईंड असलेल्या वाल्मिक कराडबद्दल दररोज वेगवेगळ्या अपडेट समोर येत आहेत. राजकारणाच्या चौकटीत हात असलेल्या वाल्मिक कराडचा आता फिल्म इंडस्ट्रीशी असल्याचे समजते आहे.

Santosh Deshmukh Murder Case : अखेर पापाचा घडा भरला! संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींची हत्येची कबुली

मिळालेल्या माहितीनुसार, मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या वाल्मिक कराडला महिनाभरापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर वाल्मिक कराड संदर्भात अनेक माहिती पोलिसांच्या हाती आली. तसेच संतोष देशमुख हत्येचे फोटो देखील समोर आले होते. या हत्येतील प्रमुख गुन्हेगारांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान आता मास्टर माईंड असलेल्या वाल्मिक कराडबद्दल सिनेनिर्माते असल्याचे समोर आले आहे. वाल्मिक यांचा एक आयडी कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशन या सिनेमात या संघटनेचे ओळखपत्र पाहायला मिळते. या संघटनेचे वाल्मिक कराड हे लाईफ टाईम मेंबर असून बी आर जे फिल्म प्रोडक्शन ही निर्मिती संस्था त्यांची असल्याचे त्यात नमूद केले गेले आहे.या कार्डवर त्यांचा २३४८० असा मेंबर नंबर आहे. याशिवाय बीकेसी येथील याच फिल्म प्रोडक्शन च्या ऑफिसचा फोटो देखील समोर आला आहे. हे ऑफिस वाल्मिक कराड यांचेच असल्याचा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. त्यामुळे आता औष्णिक वीज केंद्राच्या राखेतून अवैध्यरित्या मिळणारा पैसा वाल्मिक कराड फिल्म इंडस्ट्रीत गुंतवत होते का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -