Friday, May 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPrashant Koratkar : प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. कोल्हापूरच्या न्यायालयाने कोरटकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

‘नमो शेतकरी योजने’चा सहावा हप्ता ३१ मार्चपूर्वी बँक खात्यात जमा होणार

प्रशांत कोरटकरला तेलंगणातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरातून अटक करण्यात आली. कोल्हापूर पोलिसांनी २४ मार्च रोजी कोरटकरला तेलंगणातून ताब्यात घेतले आणि २५ मार्च रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने २५ मार्च रोजी कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. यानंतर २८ मार्च रोजी पुन्हा एकदा हजर केले असताना त्याला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली. या कोठडीची मुदत संपताच त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

Raj Thackeray : मनसेचा गुढी पाडवा मेळावा, शिवाजी पार्कवर जय्यत तयारी, राज ठाकरे काय बोलणार ?

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यानंतर फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला कोणी आणि कशा स्वरुपात मदत केली याचा तपास पोलीस करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -