मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर नवीन आर्थिक वर्षाच्या तसेच गुढी पाडव्याच्या पूर्व संध्येला मुंबई महापालिकेच्या उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या बढती आणि बदली करून महापालिका आयुक्त डॉ.भूषण गगराणी यांनी एक प्रकारे खांदेपालट केली आहे. मुंबई महापालिकेतील सह आयुक्त तथा उपायुक्त यांच्या बदली करताना ३ सहायक आयुक्तांना उपायुक्त पदी बढती देत नवीन जब्बदारी सोपवली आहे.
तसेच चार नवीन सहाय्यक आयुक्त यांच्या नियुक्तीनंतर सहायक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तपदी असलेल्या अधिकाऱ्यांच्या या बढती आणि बदलीमुळे नवीन आर्थिक वर्षात आता हे अधिकारी नव्या जोमाने कामाला लागलेले पाहायला मिळणार आहेत.
विश्वास शंकरवार, सहआयुक्त (परिमंडळ ४) – सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) (+संपर्क अधिकारी, मागासवर्ग कक्ष)
डॉ. भाग्यश्री कापसे, उपायुक्त (परिमंडळ ७) -उपायुक्त (परिमंडळ ४)
संजय कुऱ्हाडे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) (+प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एडस् नियंत्रण संस्था) – उपायुक्त (परिमंडळ ७)
शरद उघडे, सहायक आयुक्त (डी विभाग) – उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) (+माहिती तंत्रज्ञान विभाग) (+प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एडस् नियंत्रण संस्था)
अजित आंबी, सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) – उपायुक्त (उद्याने)
पांडुरंग गोसावी, प्रमुख लेखापाल (पाणीपुरवठा व मलनिसारण) – उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते)
विश्वास मोटे, सहायक आयुक्त (एम पश्चिम विभाग) – उपायुक्त (परिमंडळ ३)
विनायक विसपुते, सहायक आयुक्त (एच पश्चिम विभाग) – सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) (+सहायक आयुक्त, अतिक्रमण निर्मूलन, पूर्व व पश्चिम उपनगरे)
मनीष वळंजू, सहायक आयुक्त (के पूर्व विभाग) – सहायक आयुक्त (डी विभाग) (+सहायक आयुक्त, बाजार विभाग – अतिरिक्त कार्यभार)
अलका ससाणे, सहायक आयुक्त (एम पूर्व विभाग) – सहायक आयुक्त (एस विभाग)
नितीन शुक्ला, सहायक आयुक्त (एफ उत्तर विभाग) – सहायक आयुक्त (बी विभाग)
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…