बीड : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुग्रीव कराड हे एक नवे नाव समोर आले आहे.
आवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडणीला विरोध केल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे आतापर्यंतच्या तपासातून उघड झाले आहे. पण या प्रकरणात अटकेत असलेल्यांपैकी जयराम चाटे आणि महेश केदार या दोन आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. चाटे आणि केदारने दिलेल्या जबाबातील सुग्रीव कराड कोण आहे ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड मास्टरमाईंड असल्याचे आतापर्यंत सर्व समजत होते. पण चाटे आणि केदारने दिलेल्या जबाबात सुग्रीव कराड हे वेगळेच नाव पुढे आले आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरुन सरपंच संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली होती. त्याचा बदला म्हणून घुले आणि त्याच्या साथीदारांनी देशमुख यांना मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला, असं जयराम चाटे आणि महेश केदारने पोलिसांना सांगितले. चाटे आणि केदार यांच्या जबाबात खंडणीचा उल्लेख कुठेही आलेला नाही.
आवादा कंपनीच्या आवारात सुदर्शन घुलेला मारहाण झाली होती. सरपंच देशमुख आणि ग्रामस्थांनी सुग्रीव कराडच्या सांगण्यावरुन घुलेला मारहाण केली. या प्रकारामुळे घुले आणि वाल्मिक अण्णा कराडचा अपमान झाल्याचे फरार आरोपी कृष्णा आंधळेने आम्हाला सांगितले. घुले आणि वाल्मिक अण्णा कराडच्या अपमानाचा बदला घ्यावा लागेल, असे आंधळे आम्हाला म्हणाला होता; असे चाटे आणि केदार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.
घुलेला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला; असे चाटे आणि केदार यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्या जबाबामुळे या प्रकरणात सुग्रीव कराड हे नवे नाव पुढे आले आहे. आता हा सुग्रीव कराड असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…