मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात २६ मार्च रोजी गुवाहाटी येथे सामना झाला. या आयपीएल २०२५ सामन्यात पहिल्यांदाच एका डावात ‘सेकंड बॉल’चा नियम वापरण्यात आला. केकेआरच्या डावाच्या १७ व्या षटकात राजस्थान रॉयल्सने प्रभारी कर्णधार रियान परागच्या नेतृत्वाखाली चेंडू बदलण्याची विनंती केली, पण तो सामन्याचा रंग बदलण्यासाठी पुरेसा नव्हता. नवीन नियम वापरुनही, राजस्थान रॉयल्सचा केकेआरकडून आठ विकेट्सनी पराभव झाला. हा त्याचा सलग दुसरा पराभव होता. क्विंटन डी कॉकच्या ६१ चेंडूत ९७ धावांच्या शानदार खेळीमुळे कोलकाताने हंगामातील पहिला विजय नोंदवला.
सांयकाळी खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये, जर पंचांना वाटत असेल की दव पडल्याने खेळावर परिणाम होत असेल तर ते दुसऱ्या डावाच्या ११ व्या षटकातून नवीन चेंडू वापरण्याची परवानगी देऊ शकतात. हा नियम फक्त संध्याकाळी होणाऱ्या सामन्यांना लागू असेल. दुपारी होणाऱ्या सामन्यांना हा नियम लागू होणार नाही. यामुळे उच्च-स्कोअरिंग सामने राखण्यास मदत होईल. जेणेकरून दोन्ही डावात खेळ संतुलित राहील आणि पाठलाग करणाऱ्या संघाला दव पडण्याची मदत मिळणार नाही. अनेकदा संध्याकाळच्या सामन्यांमध्ये, दवामुळे, नाणेफेक जिंकणारे संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. यामुळे आता खेळ संतुलित होईल.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…