Disha Salian Case : “दिशा सालियनच्या मृत्यूमागे आदित्य ठाकरे आणि सेलिब्रेटींचे ड्रग्ज रॅकेट”

Share

शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांचा खळबळजनक दावा

मुंबई : दिशा सालियन हत्येच्या मागे (Disha Salian Case) आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा हात असल्याचा संशय आता अधिक बळावत आहे, असा गंभीर आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. या प्रकरणाशी मुंबईतील सेलिब्रिटी ड्रग्ज रॅकेटचा संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे बाबतची चर्चा वाढू लागल्यावर उबाठा गटाकडून सदर प्रकरणावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी मुद्दामहून कुणाल कामराचे वादग्रस्त गाणे व्हायरल करण्यात आले, असा आरोप संजय निरुपम यांनी केला. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेवर कुणाल कामरावर निश्चित कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी केलेले नवे आरोप गंभीर असून, त्यांच्या तक्रारीवर लवकरच मालवणी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला जाईल, असे निरुपम यांनी स्पष्ट केले.

“उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन हत्याकांडात मोठी भूमिका आहे, याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत,” असा दावा संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला.

सतीश सालियन यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार मालवणी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदणीसाठी पाठवण्यात आली आहे. दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला होता, आणि तो संशयास्पद होता. मृत्यूपूर्वीच्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती, अशी माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारने या प्रकरणी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून चौकशी सुरू आहे. पोस्टमार्टम अहवाल तीन दिवस उशिराने मिळाला. दिशाचा मृतदेह इमारतीपासून २५ फूट अंतरावर सापडला, मात्र शरीरावर कोणतीही जखम नव्हती. या सर्व गोष्टी संशयास्पद असून, नव्याने सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे निरुपम म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. सीबीआयने दिशा सालियन नव्हे, तर सुशांत सिंह राजपूत हत्येचा तपास केला होता. त्यामुळे खोट्या प्रतिज्ञापत्रावर कारवाई होईल, असे निरुपम यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यावर संशय आहे. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटशी संबंधित असल्याचा आरोप आहे. ड्रग्ज पुरवठादार समीर खान याने नार्कोटिक्स ब्युरोकडे कबुली दिली होती. चौकशीत समीर खानने आदित्य ठाकरे ड्रग्ज घेत असल्याचे सांगितले होते.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

3 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

3 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

4 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

4 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

4 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

5 hours ago