IPL 2025: अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर चेन्नईचा विजय

Share

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या हंगामातील तिसरा सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला. या अटीतटीच्या सामन्यात संघाने बाजी मारली. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने १५६ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात चेन्नईच्या संघाने १५८ धावा करत सामना जिंकला. चेन्नईने हा सामना ४ विकेट राखत जिंकला.

चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक धावा केल्या. तर कर्णधार ऋतुराज गायकवाडने ५३ धावा तडकावल्या. त्याने यावेळी ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. सुरूवातीला चेन्नई मुंबईने दिलेले हे आव्हान सहज पार करेल असे वाटत होते मात्र त्यांच्या फलंदाजांच्या नाकात दम केला. शेवटच्या ८ बॉलमध्ये ४ धावा हव्या असताना एमएस धोनी मैदानात आला. मात्र त्याला सामना फिनिश करता आला नाही. रचिन रवींद्रने विनिंग षटकार ठोकत सामना जिंकवून दिला.

सामन्यात मुंबईची सुरूवात खराब राहिली होती. कर्णधार रोहित शर्मा न खेळता पहिल्याच षटकात बाद झाला होता. यानंतर मुंबईने सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र सातत्याने अंतराने विकेट पडत गेले आणि संघाला केवळ दीडशे धावांचा टप्पा गाठता आला.

मुंबईने ९ विकेट गमावत १५५ धावा केल्या. संघासाठी तिलक वर्माने सर्वाधिक ३१ धावा केल्या. या सामन्यात कर्णधारपद सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादव २९ धावा करून बाद झाला. अखेरीस दीपक चाहरने १५ बॉलमध्ये २८ धावा केल्या. याशिवाय कोणत्याही फलंदाजाला २० चा आकडा पार करता आला नाही. स्पिनर नूर अहमदने आपली जादू दाखवली आणि ४ विकेट मिळवल्या.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

2 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

2 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

2 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

2 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

3 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

4 hours ago