मुंबई : भारतीय कायद्यातील तरतुदीनुसार बलात्काराच्या आरोपीला आधी चौकशीसाठी अटक करतात. दिशा सालियन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. दिशाच्या वडिलांनी केलेल्या या याचिकेत गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला अटक करुन त्याची चौकशी होऊ शकते. जो न्याया सामान्यांना तोच न्याय माजी मंत्र्यांना आणि आमदारांना लागू आहे; असे मंत्री नितेश राणे म्हणाले.
दिशाच्या वडिलांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका करुन दिशाच्या मृत्यूची चौकशी नव्याने करण्याची मागणी केली आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डीनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात याचिकेच्याआधारे कायद्यातील तरतुदीनुसार उचित कारवाई व्हायला पाहिजे, मंत्री नितेश राणे म्हणाले.
दिशाच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिवंगत दिशा सालियन हिच्या मृत्यूचा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका करुन दिशाच्या मृत्यूची चौकशी नव्याने करण्याची मागणी केली आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डीनो मोरिया यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून केला आहे. दिशाच्या मृत्यूची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. त्यामुळे या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिशाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी असा दावा केला होता की तिची हत्या झालेली नाही, आपल्या मुलीची बदनामी करु नका असं आवाहनही त्यांनी केलं होतं. मात्र, आता त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…