Share

माथेराम (वार्ताहर) : दस्तुरी नाक्यावरील येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली जाते. याचा येथील सर्वसामान्य कष्टकरी पासून ते हॉटेल इंडस्ट्री या सर्वांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला आहे. ही फसवणुकीची पद्धत लवकरच बंद करण्यात आली नाही तर १८ मार्चपासून बेमुदत माथेरान बंद करण्यात येणार असा इशारा समितीने सर्वच अधिकारी वर्गाला दिला होता. त्यासाठी अधीक्षक कार्यालयात समितीच्या सदस्यांच्या बैठकीचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या बैठकीत स्थानिक प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने मागणी केलेल्या मागण्यांची पूर्तता स्थानिक प्रशासन स्थानिक पातळीवर करू शकत नसल्याने या पर्यटन बचाव संघर्ष समितीने मंगळवार पासून बेमुदत बंद जाहीर केला असून त्यास येथील हॉटेल इंडस्ट्री, ई रिक्षा संघटना, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संस्था यांनी समर्थन दिले असून जोपर्यंत स्थानिक प्रशासन लेखी स्वरूपात मागणी केलेल्या शुल्लक मागण्या कायमस्वरूपी पूर्ण करत नाही तोपर्यंत हे पर्यटनस्थळ बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या बंदमध्ये शालेय विद्यार्थ्यांना ई रिक्षाची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु कोणाही प्रवाशांना ही सेवा उपलब्ध होणार नाही असे संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल यांनी सांगितले आहे.

माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांना ज्याप्रकारे फसवून त्यांची दिशाभूल केली जाते, त्यांना बळजबरीने गावात येण्याऐवजी पॉईंट्स दाखवून उशिरा हॉटेलमध्ये सोडण्यात येते. मिनिट्रेन बंद असून ई रिक्षाची सेवा फक्त स्थानिकांना दिली जाते अशी खोटी माहिती देऊन स्वतःच्या घोड्यावर बसवून नवख्या पर्यटकांची दिशाभूल करून अव्वाच्या सव्वा रक्कम उकाळली जाते. त्यासाठी दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले असोत किंवा कुली, रूम्सचे एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये. जागोजागी माहिती फलक लावण्यात यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने फेब्रुवारीच्या २७ तारखेला मागणी केली होती.

ही मागणी पूर्ण झाली नाही तर माथेरान बेमुदत बंद करण्याचा इशारा सुध्दा या समितीने अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी राहुल इंगळे, वनखात्याच्या अधिकारी वर्गाला तसेच पोलीस ठाण्यात सुध्दा लेखी निवेदना द्वारे दिला होता. परंतु दहा दिवस उलटूनही या स्थानिक प्रशासनाने काहीही उपाययोजना केली नाही त्यामुळे नाईलाजाने माथेरान बेमुदत बंद करून शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी समितीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी समितीचे प्रमुख कुलदीप जाधव, मनोज खेडकर, शिवाजी शिंदे, प्रवीण सकपाळ, राजेश चौधरी, प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव, हॉटेल इंडस्ट्रीचे उमेश दुबल,ई रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, चर्मकार समाज अध्यक्ष नितेश कदम, महिला आघाडीच्या संगीता जांभळे, सुहासिनी शिंदे, प्रतिभा घावरे, स्वाती कुमार, सुहासिनी दाभेकर, अंकिता तोरणे, श्रुतिका दाभेकर यांसह अन्य उपस्थित होते.

Recent Posts

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीटदर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने आजपासून…

4 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

17 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

37 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

56 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

59 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

2 hours ago