Friday, May 9, 2025
Homeदेशखलिस्तानी संघटनेवर कारवाई करावी

खलिस्तानी संघटनेवर कारवाई करावी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था):भारतविरोधी कारवाया करणाऱ्या खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टिसच्या विरोधात अमेरिकेने कठोर पावले उचलत कारवाई करावी अशी मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकन गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांच्याकडे केली आहे.

अमेरिकन गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड रायसीना डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. त्यांनी सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांनी तुलसी गबार्ड यांच्याशी झालेल्या भेटीत खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टिसच्या भारतविरोधी कारवायांचा मुद्दा उपस्थित केला आणि या संघटनेवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.

पाकिस्तानविरोधात लढाईत निर्वासित बलुचिस्तानने मागितली भारताकडे मदत

तुलसी गबार्ड यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान संरक्षणमंत्र्यांनी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या नेतृत्वाखालील एसएफआयबद्दल भारताची चिंता व्यक्त केली आणि अमेरिकेला या संघटनेवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. ही बैठक अशा वेळी झाली आहे,जेव्हा अमेरिकन वकिलांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांच्यावर एका भारतीय सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप लावला होता.पण,भारताने पन्नूच्या हत्येच्या प्रयत्नात भारताची भूमिका नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, पन्नूकडे अमेरिका आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व आहे आणि तो दहशतवादाच्या आरोपाखाली भारतात वॉन्टेड गुन्हेगार आहे. त्याला दहशतवादविरोधी कठोर कायदा बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजना निकष बदलून सुरू ठेवणार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -