मुंबई: सोन्याचे दर (Gold Rate Today) कमी व्हायचं नावच घेत नाही. गेले काही दिवस सोन्याला सोन्यासारखे दिवस आलेले पाहायला मिळत आहे. दररोज सोन्याचा भाव वाढतोच आहे. लग्नाचा हंगाम सुरु असल्याने सोन्याची मागणीही जास्त आहे. सोन्याची ही मागणी पाहता सोन्याची किंमत वाढताना दिसत आहे. लग्नाच्या हंगामात पिवळ्या धातूच्या किमतीने ऐतिहासिक टप्पा ओलांडला – प्रति १० ग्रॅम ९१,००० रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोंडीचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत असताना दिसत आहे. केवळ चार दिवसांत १० ग्रॅम सोन्याचा भाव २ हजार रुपयांनी वाढला आहे.
शनिवारी १० ग्रॅम सोन्याचा बाजारभाव करासह ९१,०५२ रुपये होता. शुक्रवारी तो ९१,६०० रुपये होता. आंतरराष्ट्रीय घडामोडींना, ज्यामध्ये अमेरिकेने व्यापारावर केलेली कारवाई समाविष्ट आहे, बाजारभाव प्रतिसाद देत आहे. आजही, बरेच लोक सोने हा सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय मानतात. सोन्याच्या वायद्याची किंमत ही दिवसेंदिवस वाढताना दिसणार आहे. काही तज्ञांच्या मते, सोन्याची किंमत येत्या काळात अजून वाढताना दिसणार आहे.
सोन्याचे सराफा बाजारातील किंमतही तशी वाढलेलीच आहे. सोन्याच्या किंमती या ग्राहकांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत. १० ग्रॅम प्रतिप्रमाणे २२ कॅरेट सोन्याची किंमत ही ८२,१९० रुपये आहे. तर १० ग्रॅम प्रतिप्रमाणे २४ कॅरेट सोन्याची किंमत ही ८९,६६० इतकी आहे. चांदीची किंमत ही एक लाखाच्या घरात असून आता १,०२,९०० इतकी आहे.
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…