Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीAir Strikes against Houthi : अमेरिकेचा हुती अतिरेक्यांवर 'एअर स्ट्राईक'

Air Strikes against Houthi : अमेरिकेचा हुती अतिरेक्यांवर ‘एअर स्ट्राईक’

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेने हुती अतिरेक्यांवर ‘एअर स्ट्राईक’ केले. अमेरिकेच्या हल्ल्यात किमान २४ हुती अतिरेक्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. हुती अतिरेक्यांच्या तळांचेही नुकसान झाले.

A. R. Rahman : ए. आर. रेहमान यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल!

लाल समुद्रामार्गे जाणाऱ्या अमेरिकेच्या जहाजांवर हल्ले करणे तसेच या जहाजांमधील माल लुटणे हे प्रकार हुती अतिरेकी मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे अमेरिकेच्या लाल समुद्रमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर परिणाम झाला आहे. अमेरिकेचे एकही व्यावसायिक जहाज मागील वर्षभरात लाल समुद्रमार्गे सुरक्षित प्रवास करुन सुएझ कालवा पार करू शकलेले नाही. अनेक जहाजांना हुती अतिरेक्यांच्या हल्ल्यांना समारे जावे लागले. चार महिन्यांपूर्वी अमेरिकेची एक युद्धनौका लाल समुद्रमार्गे प्रवास करत होती. या युद्धनौकेलाही हुती अतिरेक्यांनी लक्ष्य केले होते. पण आधुनिक यंत्रणेमुळे अतिरेक्यांचा हल्ला परतवून युद्धनौकेने पुढचा प्रवास केला होता. यामुळे हुती अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी अमेरिकेने कारवाई केली.

वाहनावर फास्टॅग लावा अन्यथा दुप्पट पैसे भरा

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या स्क्रीनवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एअर स्ट्राईकचे थेट प्रक्षेपण बघितले. हल्ला सुरू असताना ट्रम्प उभे राहून थेट प्रक्षेपण बघत होते.

हुती अतिरेक्यांना इराणचा पाठिंबा आहे. या अतिरेक्यांच्या कारवायांमुळे जागतिक शांततेला आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला बाधा निर्माण झाली आहे. अमेरिकेसह जगाचे आर्थिक नुकसान होत आहे; असे ट्रम्प म्हणाले. बाएडेन प्रशासनाने हुती अतिरेक्यांवर कारवाई केली नाही. यामुळे अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या. हे प्रकार ट्रम्प प्रशासन खपवून घेणार नाही, असे जाहीर करत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हुती अतिरेक्यांविरूद्धच्या कारवाईचा आदेश दिला.

ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर अमेरिकेने मध्य आशियात अतिरेक्यांविरोधात केलेली ताजी कारवाई म्हणजे हुतीला दिलेला मोठा दणका आहे. याआधी हुती अतिरेक्यांविरोधात एवढी मोठी धडक कारवाई झालेली नाही, असे ट्रम्प प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -