Share

हलकं-फुलकं – राजश्री वटे

प… पसरलेलं हे कधी
आवरायचं
सा… सारं काही इतस्त:
विखुरलंय
रा… राहू द्यावं असंच की
आवरायला घ्यावं

माणूस जीवनाचा पसारा…
जन्मापासून… मरणापर्यंत…
जन्म झाला… लंगोटा, दुपटे, झबले, टोपडे घरभर बाळाचं लहानपण रांगतं आहे कपड्यांच्या पसाऱ्यात… बेबी पावडरच्या सुगंधात!

जरा पाय फुटू द्या… घरभर खेळणी व त्यांच्यातील वेगवेगळ्या आवाजाचा टिक टिक टॉक टॉकचा पसारा!
नंतर शाळेचा पसारा तर कित्येक वर्ष मानगुटीवर रेंगाळत असतो… गणवेष, पुस्तकं, बुटमोजे, प्रोजेकट्स, पेपर्स, त्यात कंपास बॉक्समधला पसारा तर काही विचारायलाच नको त्यातील अर्ध्या गोष्टींचा कधी वापर सुद्धा झालेला नसतो, पण तो असणं गरजेचं असतं…

मग कॉलेजमध्ये कपडे व पुस्तकं यांच्या पसाऱ्याबद्दल तर काही बोलायची सोयच नाही… जिकडे खुंटी तिथे कपडे मुलांचे व अभ्यासाची पुस्तकं तर टेबल सोडून सगळीकडे लोळत असतात अभ्यास करणाऱ्या सकट!!
एकदा जबाबदारी खांद्यावर आली की, आफिसमधील फायलींच्या पसाऱ्यातून डोकं वर काढायला फुरसत नसते… फायलींच्या पसाऱ्यातून संसाराच्या पसाऱ्यात नुसती ओढाताण असते जीवाची… काय करणार विश्व निर्मात्याने एवढा जगभराचा पसारा मांडून ठेवला आहे… त्यांच्या पसाऱ्यात स्वत्व शोधत अख्खं आयुष्य संपून जातं… आजूबाजूला समाजाचा, नात्यांचा पसारा असल्याशिवाय मात्र जीवनाला काही अर्थ नाही नक्कीच !!

पुरा संसार ही एक पसारा है…
‘‘जगीं हा खास वेड्यांचा l
पसारा माजला सारा l
गमे या भ्रान्त संसारी l
ध्रुवाचा ‘वेड’ हा तारा ll”
या विश्वाच्या पसाऱ्यात
“रणदूदूंभी” या नाटकातलं पद नक्कीच आठवतं!!

पण मजेची गोष्ट ही की हा पसरलेला पसारा आवरायला स्त्री आपलं उभं आयुष्य घालवते…
पसरलेलं आवरत जाते, दमते, चिडचिड करते पण पुन्हा नव्या दमानं आवरून घराला घरपण देते…
संसार म्हणजे हेच की…
एकाने पसरवायचं दुसऱ्याने आवरायचं…
मग ते घर असो की मन !!
घराचा पसारा तरी लवकर आवरला जातो पण मनाचा पसारा… त्याला तर काही मर्यादाच नाही… तिथे सगळं अस्ताव्यस्त…

कुठे सुरू होतो अन् कुठे संपतो… कुठून सुरुवात करायची व कुठे संपवायची… अशक्य!!
स्त्रीच्या सगळ्यात जिव्हाळ्याची म्हणजे तिची पर्स… सगळं विश्व त्यात सामावलेलं असतं… काय नाही मिळत हो त्यात… नाव काढताच ते पर्समध्ये सापडलंच पाहिजे मग औषधं असो नाहीतर मेकअपचं सामान… आणि… आणि बरंच काही!
जेव्हा ती स्वयंपाकघरात पसारा करते तेव्हाच रुचकर पदार्थ ताटात पडतात… ड्रेसिंग टेबलवर सौंदर्य प्रसाधनाचा पसारा करते तेव्हा एक सुंदर स्त्री समोर येते… अंगणात रंगाचा पसारा घालतो तेव्हा अप्रतिम रांगोळी साकारते… शाई जेव्हा कागदावर अक्षरांचा पसारा घालते तेव्हा कुठे अप्रतिम लिखाणाचा साक्षात्कार होतो…
किती पसारा करू तितका कमीच आहे शब्दांचा इथे…
जितका आवरू कमीच आहे कारण पुन्हा पुन्हा त्याचं पुनःरुजीवन होणारच…
बघा, जमलं तर आवरा…
नाहीतर राहू द्या…!!

Tags: lifespread

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

42 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

44 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

2 hours ago