Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईत घरोघरी शौचालय बांधण्यासाठी महापालिकेकडून मिळणार अनुदान

मुंबईत घरोघरी शौचालय बांधण्यासाठी महापालिकेकडून मिळणार अनुदान

झोपडपट्टी, चाळींमधील नागरिकांना मिळणार आधार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई हगणदारीमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून मौचालयांच्या उभारणीकडे विशेष लक्ष केंद्रित केले जात असतानाच जास्तीत जास्त नागरिकांना घरोघरी शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता करण्यासाठी शासनासह महापालिकेच्यावतीने अनुदान दिले जात आहे. घरोघरी शौचालयासाठी यापूर्वी महापालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानात आता वाढ केली जात असून यापुढे घरोघरी शौचालयाकरता केंद्र शासनाचे ४ हजार आणि राज्य शासनाकडून १ हजार अशाप्रकारे ५ हजार अनुदानाव्यतिरिक्त आता मुंबई महानगरपालिकेकडून अतिरिक्त ११ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शौचालय उभारण्यासाठी मुंबईत लाभार्थ्यांला एकूण १६ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

“देशातील सर्व शहरामध्ये व ग्रामीण भागात स्वच्छता व शौचालय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ०२ ऑक्टोबर २०१४ पासून “स्वच्छ भारत अभियान १.०” हे केंद्र शासनाद्वारे राबविण्यात आले आहे. हे अभियान महाराष्ट्र राज्यात १५ मे २०१५ पासून राबवले जात आहे. त्यानुसार हे अभियान मुंबई महानगरपालिकेद्वारे राबविण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियान १० अंतर्गत वैयक्तिक घरगुती शौचालय घटकांतर्गत पात्र लाभाथों कुटुंबाना केंद्र शासनाकडून ४ हजार रुपये व राज्य शासनाकडून १ हजार रुपये इतके असे एकूण ५ हजार रुपये अनुदान घरगुती शौचालयासाठी बेट लाभार्थीच्या खात्यात देण्यात येत होते. स्वच्छ भारत अभिमान १.० राबवताना महानगरपलिकेचे २ हजार रुपये अनुदान मिळत होते. परंतु यामध्ये अर्जदार जिथे राहत असेल त्यांच्या ५०० मीटर परिघामध्ये सामुदायिक शौचालय नसेल, तरच ती व्यक्ती या अनुदास पात्र होती. झोपडपट्टी वस्ती तथा चाळीमध्ये सामुहिक शौचालय उपलब्ध असल्याने या अनुदानाचा लाभ यातील जाचक अटींमुळे मिळत नव्हता. या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० हे एक अभियान राबविण्यास शासन निर्णयानुसार १५ जुलै, २०२२ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हागणदारीमुक्त ठेवण्याच्या दृष्टीकोनातून हे अभियान राबवण्यात येत आहे.

नव्या योजनेमध्ये अट वगळली

शाश्वत स्वच्छता अतर्गत वैयक्तिक घरगुती शौचालय या घटकानुसार नविन स्वतंत्र कुटुंबे, स्थलांतरीत कुटुंबे, सामुदायिक शौचालयांचा वापर करणारी कुटुंबे व अस्वच्छ सौपालये असणारी लाभार्थी अधिकृत तथा अनधिकृत वसाहतीमध्ये राहत असतील, तसेच अधिकृत आणि अनधिकृत असलेल्या झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्याना ही सुविधा उपलब्ध करून द्यावयाची आहे. भारत अभियानानुसार या अभियानात पात्र फक्त पूर्वीच्या स्वच्छ लाभ घेतलेले लाभार्थी असणार नाहीत. अशी अट असली तरी पासून “स्वच्छ भारत अभियान १.०”मधील एक महत्वाची अट ही पासून “स्वच्छ भारत अभियान २.०” मधून वगळण्यात आली आहे.ती म्हणजे पात्र लाभार्थी अर्जदाराच्या ५०० मीटर परिघात जर सामुदायिक शौचालय असेल तर त्याला पूर्वी अनुदान मंजूर केले जात नव्हते, परंतु आता नव्या योजनेमध्ये ही अट वगळण्यात आली आहे. त्यामुळे घरी शौयालय उभारायला लाभार्थी कुटुंबाला महापालिकेमार्फत केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त ११ हजार एवढे अनुदान मिळणार आहे.

वैयक्तिक घरगुती शौचालय करिता वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामाचा अंदाजित खर्च हा ३० हजार रुपये एवढ़ा विद्यारात घेवून मुंबईत केंद्र शासनाचा व राज्य शासनाचा अनुक्रमे, ४ हजार रुपये व १ हजार एवढा निधी निश्चित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त मुंबई महापालिकेकडून अतिरिक्त ११ हजार रुपयांचा निधी हा उस्नुदान स्वरुपात मिळणार असून मुंबईत घरोघरी शौचालय उभारण्यासाठी तब्बल १६ हजार रुपयाचे अनुदान शासन आणि महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे, केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून प्राप्त अनुदान लाभार्थी कुटुंबाना नव्याने विकसित झालेल्या पब्लिक फायनान्या मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे थेट खात्यात जमा होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -