दिसपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ईशान्य भारताच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर असून आज, शुक्रवारी आसामच्या जोरहाट येथे पोहोचले. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जोरहाट विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत केले.
गृहमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, जोरहाटला पोहोचल्यानंतर लगेचच शाह गोलाघाट जिल्ह्यातील डेरगावला जातील,
जिथे ते लचित बर्फुकन पोलिस अकादमीमध्ये रात्रीचा मुक्काम करतील. त्यानंतर उद्या, शनिवारी सकाळी मिझोरामला जाण्यापूर्वी गृहमंत्री शाह अत्याधुनिक पोलिस अकादमीचे उद्घाटन करतील. मिझोरममध्ये, अमित शाह आसाम रायफल्सचे कार्यालय ऐझॉलहून झोखावसांग येथे स्थलांतरित करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यानंतर ते गुवाहाटीला
परततील आणि कोइनाधारा येथील स्टेट गेस्ट हाऊसमध्ये रात्रीचा मुक्काम करतील. तसेच रविवारी सकाळी, गृहमंत्री आसाममधील कोक्राझार जिल्ह्यातील डोटमा येथे ऑल बोडो स्टुडंट्स युनियन (एबीएसयू) च्या 57 व्या वार्षिक परिषदेला संबोधित करण्यासाठी रवाना होतील.
शाह दुपारी गुवाहाटीला परततील आणि ईशान्येकडील 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भारतीय न्यायिक संहितेच्या प्रगतीचा आढावा घेतील.अधिकाऱ्यांच्या मते, या बैठकीत सर्व राज्ये आतापर्यंत बीएनएसच्या अंमलबजावणीची माहिती सादर करतील, त्यानंतर अमित शाह रविवारी रात्री नवी दिल्लीला रवाना होतील.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…