रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित व प्रतीक्षेतील कशेडी घाटाला पर्याय असणारे दोन्ही बोगदे सोमवारी (दि. १०) सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुले झाल्याने शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
दोन्ही बोगद्यांत कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणकडे ११ केव्ही क्षमतेच्या विजेची मागणी केली आहे. त्यासाठी ८० लाख रुपयांची अनामत रक्कम भरणा करण्याची सूचना महावितरणने केली होती. मात्र, अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने शिमगोत्सवात दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील की नाही, याबाबत साशंकता होती.मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन्ही बोगद्यांत जनरेटरची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतल्याने दोन्ही बोगद्यांतून वाहतूक सुरू झाली आहे. दोन्ही बोगदे कार्यान्वित झाले असले तरी अजूनही काही कामे अपूर्ण आहेत.
बोगद्यातील वीजपुरवठा खंडित झाल्यास वाहतूक व्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मार्चअखेरपर्यंत दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, शिमगोत्सवासाठी कोकणाकडे येणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते. त्यामुळे लगबगीने दोन्ही बोगदे सुरू करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…