रत्नागिरी : कसबा संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथील रोहित्र स्ट्रक्चर अन्य ठिकाणी हलविण्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे १०० केव्हीए आणि २०० केव्हीए रोहित्रे उभी होती. मात्र त्यामुळे स्मारकाजवळ अडचण निर्माण होत असल्याने ती हलवण्याची मागणी स्थानिकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी आयोजित कार्यक्रमात कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्याकडे केली होती. माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी मंजुरीसाठी पत्र दिले.
यानुसार रत्नागिरीच्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये या रोहित्र स्ट्रक्चर स्थलांतरणासाठी २२ लाख ६९ हजार ९६८ रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला. याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशा सूचना खा. नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार या कामाचा निधी महावितरणकडे वर्ग झाला असून येत्या दोन दिवसांत ही रोहित्रे हलविण्यात येणार आहेत. गतिमानतेने झालेल्या या कामाबद्दल आमदार निलेश राणे आणि खासदार नारायण राणे यांचे आभार मानण्यात येत आहेत.
जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…