निरोगी आयुष्यासाठी तोंडाची काळजी घेणे आवश्यक

Share

मुंबई : स्वतःला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी तोंडाची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. सोनिया दत्ता सांगतात की दररोज तोंडाची योग्य काळजी घेतल्यास दात मजबूत राहतात. जर तोंडाची योग्य काळजी नाही घेतली तर पोकळी, हिरड्यांचे आजार आणि तोंडाची दुर्गंधी देखील येऊ शकते. तसेच तोंडाच्या स्वच्छतेची काळजी न घेतल्यास हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका देखील निर्माण होऊ शकतो.

मजबूत दातांसाठी चांगली दिनचर्या पाळण्याचा सल्ला डॉ. सोनिया देतात. नियमितपणे दात घासणे, फ्लॉस वापरणे आणि दातांची तपासणी करणे आवश्यक आहे. क्लिनिकली चाचणी केलेल्या डाबर रेडपेस्टसारख्या चांगल्या टूथपेस्टने दिवसातून दोनदा ब्रश केल्यास दात प्लाक आणि बॅक्टरीयापासून वाचू शकतात. दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास अन्नाचे कण तोंडात अडकणार नाहीत, लाळ तयार होण्यास मदत होईल आणि तुमचे दात नैसर्गिकरित्या निरोगी राहतील.

मौखिक काळजीसाठी आयुर्वेदाचे असलेले महत्व आज लोकांना समजत आहे. लवंग, पुदिनासारख्या आयुर्वेदिक घटकांवर हिरड्यांच्या आरोग्यासाठी आणि श्वास ताजेतवाने करण्यासाठी विश्वास ठेवला जातो. लवंग त्याच्या अँटीबॅक्टरीयल गुणधर्मांमुळे हिरड्या निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच पुदिना श्वास ताजेतवाने करतो. इंडियन डेंटल असोसिएशन मान्यताप्राप्त डाबर रेड पेस्टआयुर्वेदाच्या समान तत्वांवर आधारित आहे आणि आधुनिक विज्ञानाच्या संयोजनाने तुम्हाला दोन्हीचे फायदे मिळतात. तुमच्या तोंडाच्या काळजीच्या दिनचर्येत या नैसर्गिक घटकांचा समावेश करून तुम्ही तोंडाची चांगली काळजी घेऊ शकता.

संतुलित आहाराचा थेट परिणाम दातांच्या आरोग्यावर होतो. काही पदार्थ असे आहेत जे दात मजबूत करतात. त्याच वेळी काही पदार्थ असे आहेत जे दातांना हानी पोहोचवतात. दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि बदाम यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने दात मजबूत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, सफरचंद आणि गाजर यांसारखी फळे आणि भाज्या नैसर्गिकरित्या दात स्वच्छ करतात. तर साखरेचे पदार्थ, चिकट कँडीज, कार्बोनेटेड पेये – हे सर्व पदार्थ तोंडात हानिकारक जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात. ज्यामुळे पोकळी निर्माण होऊ शकते.

Tags: Oral Hygiene

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

3 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

3 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

4 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

4 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

4 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

5 hours ago