मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. नुकतीच कोरोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि आता तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहोत. कुणालाही कुणाचे देणेघेणे नाही. श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा, असे राज ठाकरे म्हणाले होते. यावर राज ठाकरे यांचे वक्तव्य हे श्रद्धाळू भाविकांचा अपमान करणारे असल्याचे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली. राज ठाकरे यांचे वक्तव्य हे श्रद्धाळू भाविकांचा अपमान करणारं आहे. हिंदू माणूस देव देवतांवर श्रद्धा ठेवणारा आहे, म्हणून दगडालाही आपण मानतो. दुसऱ्यांच्या श्रद्धेचा अपमान करू नये.
स्वच्छतेच्या मुद्द्यावर आम्हीही सहमत आहोत. राजीव गांधींपासून ते आजपर्यंत नद्या स्वच्छ झाल्या नाहीत, पण त्याच खापर काँग्रेसवर जात असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. पण देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याला प्राधान्य दिले आहे. नदी जोड प्रकल्प सिंचन गाळमुक्त धरणं असे अभिनव उपक्रम त्यांनी आणल्याचे दरेकर म्हणाले. प्रदूषण होऊ नये म्हणून हे सरकार काम करतंय. प्रदूषण होऊ नये म्हणून हे सरकार काम करत आहे. स्वच्छता आणि प्रदूषणमुक्तीबाबत प्रचंड काम सुरू आहे. चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला हवं असेही दरेकर म्हणाले.
कुंभमेळा ही शेकडो हजारो वर्षांची परंपरा आहे. आपण श्रद्धेवर जगत आहोत असेही दरेकर म्हणाले. यावेळी महापालिकेच्या बिलांच्याबाबत आम्ही कधी लक्ष घातलेले नाही, ज्यांच बिलांवर लक्ष असते ते बिलांच्या माध्यमातून मलिदा घेतात ते लक्ष ठेवतात असे दरेकर म्हणाले. सोन्यासारखी माणसे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जपता आली नाहीत, त्यांनी सोन्याचा चमचा जपला असा टोला दरेकरांनी ठाकरेंना लगावला. बाळासाहेबांनी जी सोन्यासारखी माणसे जोडली ती यांनी टिकवली नाहीत, यांनी सोन्याच्या चमचावर लक्ष दिल्याचा टोला देखील दरेकरांनी नाव न घेता संजय राऊतांना लगावला.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…