अमरावती : उन्हाची तीव्रता वाढू लागली असून ग्रामीण व डोंगराळ भागात पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू, अशा एकूण ५६ सिंचन प्रकल्पांत सद्यस्थितीत ५४ टक्के (५६८ दलघमी) जलसाठा शिल्लक आहे. यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पुरेसा जलसाठा मिळणार आहे. या भागांना टंचाईच्या झळा बसणार नसल्या तरी दोन मध्यम व लघू प्रकल्पांच्या क्षेत्रातील योजनांना मात्र टंचाईच्या झळा पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरात पाणीसाठ्यात १२ टक्क्यांची घट झाली आहे.
जिल्ह्यात अप्पर वर्धा या मोठ्या प्रकल्पासह सात मध्यम व ४८ लघू प्रकल्प आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता, तो आता ५४ टक्क्यांवर आला आहे. अप्पर वर्धा धरणात विद्यमान स्थितीत ३२० दलघमी (५६ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पातून अमरावती शहरासह ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पुरवठा करण्यात येतो. हा जलसाठा उन्हाळ्यात कमी पडणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. यंदा पावसाळ्यात मुबलक पाऊस झाल्याने धरणे शंभर टक्के भरली होती.सात मध्यम प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थिती सध्या चांगली आहे. एकूण १३७ दलघमी (५३ टक्के) जलसाठा या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत असून पंढरी व बोर्डीनाला या प्रकल्पातील साठा मे महिन्याच्या मध्यात संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तर शहानूर, चंद्रभागा, सपन व पूर्णा या प्रकल्पातील जलसाठा सध्या सरासरीने उत्तम असला तरी पुढील हंगामात पावसाला विलंब झाल्यास टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
लघू प्रकल्पांच्या क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना अडचणीत येण्याची शक्यता असून पाणीटंचाई निर्माण होण्याचा अंदाज आहे. ४८ लघू प्रकल्पांत ४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यातील काही प्रकल्पांनी तळ गाठण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे लघू प्रकल्पांच्या क्षेत्रातील नागरिकांना टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता अधिक आहे.
४८ लघू प्रकल्प – ११० / ४८
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…