मुंबई : देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या अखत्यारित मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवार ९ मार्च २०२५ रोजी मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री सुरू होणार असलेला मेगाब्लॉक रविवारी ९ मार्च रोजी पहाटे संपणार आहे. दिवसभर पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नसेल. मेगाब्लॉकमुळे रेल्वेच्या काही गाड्या रद्द केल्या जातील तर काही गाड्या विलंबाने धावतील. निवडक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. प्रवाशांनी कृपया या बदलाची माहिती करुन घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. मेगाब्लॉकचे वेळापत्रक मुंबई उपनगरीय रेल्वेशी संबंधित अॅपवर तसेच प्रत्येक स्टेशनवरील स्टेशन मास्तर कार्यालयात उपलब्ध असते. प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक जाणून घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ब्लॉक काळात जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गांवरील गाड्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गांवर वळवण्यात येणार आहे. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गांवर वळवल्या जातील. यामुळे गाड्या १५ ते ० मिनिटे विलंबाने धावतील. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान आणि सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगावदरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या रद्द केल्या जातील. पण पनवेल – कुर्ला-पनवेलदरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वेच्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गांवरील गाड्या विरार ते भाईंदर /बोरिवलीदरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गांवर वळवण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे रात्री उशिरा धावणाऱ्या गाड्या विलंबाने धावणार आहेत.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…