मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रमाणे माझाही पक्ष बदलावा यासाठी छळ झाला, असे वक्तव्य उद्धव गटाचे आमदार अनिल परब यांनी केले. या वक्तव्याद्वारे अनिल परब यांनी स्वतःची तुलना थेट छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी केली. या प्रकाराने सत्ताधारी आक्रमक झाले. अनिल परब यांच्या विरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली. भाजपाने अनिल परब यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सभागृहात मंत्री नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात शाब्दिक चकमक झाली. आमदार अनिल परब यांनी माफी मागावी, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनिल परब यांच्या वक्तव्याच्या मुद्यावरुन संघर्ष झाला. अखेर सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलायच्यावेळी अनिल परब यांनी वेगळ्याच विषयावर बोलायला सुरुवात केली. यावरुन सभागृहात गोंधळ झाला. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोला, असे सांगितल्यावर राज्यपालांचे अभिभाषण गेले… असे वक्तव्य आमदार अनिल परब यांनी केले. यावरुन तर प्रचंड गदारोळ झाला. राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात बोलताना भाषा कशी वापरावी याचेही भान आमदार महोदय बळगणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. सभागृहात या मुद्यावरुन प्रचंड गदारोळ झाला.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…