नवी मुंबई : राज्यात सध्या १२ वीच्या परीक्षा सुरू आहेत. अशातच पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे वसाहतीत १२ वीच्या उत्तरपत्रिकेंचा (HSC Exam Answer Sheets) अख्खा संचच रस्त्यावर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. २८ मार्च रोजी पार पडलेल्या परीक्षेच्या या उत्तरपत्रिका आहेत. मनसे महिला आघाडीच्या पदाधिकारी स्नेहल बागल यांना हा संच सापडल्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागाकडून वाशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी बोर्डाकडून नियमानुसार संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई विभागाच्या प्रभारी विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली. सापडलेल्या उत्तरपत्रिका मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत. याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कामोठे येथे राहणाऱ्या एका शिक्षकांकडून हे पेपर गहाळ झाले असल्याची माहिती संबंधित शिक्षकाने मुंबई विद्यापीठाला दिली आहे, असे मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
बारावीच्या बुककीपिंग विषयाची परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी झाली होती. त्याच्या २५ उत्तरपत्रिका कामोठे बस स्टॉपच्या जवळ झाडीत टाकलेल्या आढळल्या. काही कामानिमित्ताने गुरुवारी सकाळी मनसेच्या जिल्हा सचिव स्नेहल बागल कामोठे बस स्टॉपजवळ आल्या असता एक उत्तरपत्रिका त्यांच्या पायाजवळ उडत आली. कुतूहल म्हणून त्यांनी ती पाहिली असता ती बारावीची उत्तरपत्रिका असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांना माहिती दिली.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…